Horticulture

बऱ्याच देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता हेक्टीरी 25 टनांपर्यंत आहे.भारतातील राष्ट्रीय उत्पादकता जर पाहिले तर हेक्टयरी 15 टन आहे.ज्या उत्पादकता कमी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अन्नद्रव्यांचे चुकीची व्यवस्थापन हे होय.त्यामुळे अन्नद्रव्यांचे मोसंबी बागेसाठी संतुलित व्यवस्थापन करणे फार महत्वाच आहे. या लेखात आपण मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 22 December, 2021 5:03 PM IST

बऱ्याच देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता हेक्‍टरी 25 टनांपर्यंत आहे.भारतातील राष्ट्रीय उत्पादकता जर पाहिले तर हेक्‍टरी 15 टन आहे.ज्या उत्पादकता कमी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अन्नद्रव्यांचे चुकीची व्यवस्थापन हे होय.त्यामुळे अन्नद्रव्यांचे मोसंबी बागेसाठी संतुलित व्यवस्थापन करणे फार महत्वाच आहे. या लेखात आपण मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

मोसंबी बागेचे खत व्यवस्थापन

 मोसंबी बागातदार प्रामुख्याने नत्र, स्फुरदआणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा कडे जास्त लक्ष देतात.मात्र या मुख्य अन्नद्रव्य शिवाय मोसंबी बागेला मॅग्नेशियम, लोह,जस्त, मॅगनीज, तांबे आणि मॉलिब्डेनम सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत आवश्यकता असते.  तर मोसंबी बागेला सेंद्रिय खतांचा पुरवठा केला तर त्यामधून सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज थोड्या प्रमाणात भागवली जाते. परंतु अजूनही सेंद्रिय खाते हवे तेवढ्या प्रमाणात दिली जात नाही. मोसंबीला रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय व कमतरता असलेल्या  सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा पुरवठा केला तरनिश्चितच फायदा होतो. पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करणारी खते म्हणजे सेंद्रिय खत,रासायनिक खत आणि जैविक खते यांच्या एकत्रित वापर करण्याला एकात्मिक खत व्यवस्थापन असे म्हणतात.या एकात्मिक खत व्यवस्थापनामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते व त्यातून फळधारणा चांगली होते. इतकेच नाही तर फळांची प्रत सुधारते आणि उत्पादकता ही वाढते.त्यामुळे मोसंबीच्या झाडाचे वयोमान व त्याची अवस्था पाहून खते देणे आवश्यक आहे.

 खत नियोजन

  • मुख्य अन्नद्रव्य वर्षातून दोन वेळेस आमच्या जून ते जानेवारी या महिन्याच्या दरम्यान झाडाचे वय पाहून द्यावी. मोसंबी पिकासाठी जस्त, लोह,तांबे, मॅग्नेशियम,बोरॉनयासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज अधिक असते. या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची वेगवेगळी लक्षणे मोसंबीच्या झाडावर दिसतात.त्याच्या झाडाच्या वाढीवर फळधारणा, फळांची प्रत व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.महत्वाचे  म्हणजे अशी झाडे डायबॅक या रोगाला बळी पडतात.
  • माती परीक्षणानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.अन्नद्रव्य गरजेनुसार जमिनीतून किंवा फवारणीद्वारे देता येतात.त्याचप्रमाणे झाडाची पाने,खोडआणि फळे यावर प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्यांची विशिष्ट कमतरता भासू नये, या दृष्टीने जून महिन्यात शेणखतातून सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या मात्रा दरवर्षी देणे चांगले.

सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापन

लिंबूवर्गीय बागांमध्ये बहुतेक जस्त, लोह, मॅग्नेशियम व बोरॉनया सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कमी करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीतून किंवा फवारणी द्वारे देता येतात. महाराष्ट्र शासनाने पिकांना सूक्ष्मअन्नद्रव्यांचा पुरवठा करावा यासाठी दोन प्रकारच्या ग्रेड शिफारस केलेले आहेत.यामध्ये पहिल्या ग्रेड जमिनीतून द्यायचे असून ती जूनव जानेवारी महिन्यात 200 ग्रॅम प्रति झाड द्यायचेआहे. याचे दुसरे ग्रेड म्हणजे फवारणीद्वारे द्यायचे सूक्ष्म अन्नद्रव्य असून ते फवारणीद्वारे बहाराच्या फळाची अवस्था पाहून द्यायचे आहे.

English Summary: fertilizer management is important for more production of lemon orchred
Published on: 22 December 2021, 05:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)