Horticulture

सध्या महाराष्ट्रात ८०-८५ टक्के जमीन कोरडवाहू आहे, या कोरडवाहू जमिनीत प्रामुख्याने शेतकरी फळ पिके घेत असतात. या फळबागांमध्ये बोर, आवळा, चिंच. सीताफळ इत्यादी फळांचे उत्पादन घेतलं जातं. कोरडवाहू जमिनीत हलक्या, मुरमाड - बेरड, माळरानातील व डोंगर उतारावरील जमिनीचा समावेश होतो, त्यामुळे या प्रकारच्या जमिनीत प्रामुख्याने बोर, आवळा, चिंच, सीताफळ आदींची उत्पादने घेतली जातात. या पिकांची काळजी घेताना खतांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे.

Updated on 17 April, 2021 3:36 PM IST

सध्या महाराष्ट्रात ८०-८५ टक्के जमीन कोरडवाहू आहे, या कोरडवाहू जमिनीत प्रामुख्याने शेतकरी फळ पिके घेत असतात. या फळबागांमध्ये बोर, आवळा, चिंच. सीताफळ इत्यादी फळांचे उत्पादन घेतलं जातं. कोरडवाहू जमिनीत हलक्या, मुरमाड - बेरड, माळरानातील व डोंगर उतारावरील जमिनीचा समावेश होतो, त्यामुळे या प्रकारच्या जमिनीत प्रामुख्याने बोर, आवळा, चिंच, सीताफळ आदींची उत्पादने घेतली जातात. या पिकांची काळजी घेताना खतांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे. 

कसे कराल खत व्यवस्थापन :-

फळझाडांच्या व इतर पिकांच्या सुयोग्य चांगल्या वाढीसाठी रासायनिक व सेंद्रिय खतांच्या संतुलित मात्रा ठराविक पीकवाढीच्या काळात कोरडवाहू फळझाडांत खत व्यवस्थापन महत्वाचे असते.  कोरडवाहू जमिनीत घेतले जाणाऱ्या फळबागांमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण कमी ठेवून सोबत शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

 फळझाडांना खते देण्याच्या पद्धती :-

 फळबागेत खते देताना खते देण्याच्या पद्धती या बागेतील सिंचन पाण्याचा प्रकार, दोन झाडांमधील आंतर तसेच बागेतील आंतरमशागतीचा प्रकार यावर अवलंबून असतात. या सर्व बाबींचा विचार करता फळबागेत खत देण्याच्या चार पद्धती आहेत.

द्रवणीय \ द्रव रूपात खते देणे :-

या पद्धतीमध्ये रासायनिक खताबरोबर शेणखत (जनावरांचे मलमूत्र / स्लरी) लेंडीखत यांचे योग्य प्रमाणात पाण्यात मिश्रण करून ते फळझाडांच्या बुंध्या जवळील मातीमध्ये ओतले जाते.

२.घनरूपात खते देणे :-

 या पद्धती मध्ये खते ही घनरूपात दिली जातात, ही खते लहान व नविन रोपांना देताना त्यांच्या मुळांची वाढ ज्या ठिकाणां पर्यंत आहे, त्या ठिकाणी झाडाच्या भोवती गोलाकार चर काढून त्यामध्ये दिली जातात. जुन्या फळबागेमध्ये नांगराच्या अथवा ट्रक्टरच्या सहाय्याने चर काढून नंतर त्या चारामध्ये खते दिली जातात.

३.फवारणीद्वारे खते देणे :-

या पद्धती मध्ये खते ही फवारणी यंत्राच्या सहाय्याने दिली जातात यामध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा मुख्यत्वे करून समावेश होतो. या प्रकारात खते देताना वार्‍याची दिशा व वेग विचारात घेऊन फवारणी करावी, ही पद्धती खूपच उपयुक्त आहे कारण या पद्धतीमध्ये फळझाडांच्या पानांद्वारे अन्नद्रव्य लवकर शोषून घेतली जाऊन समप्रमाणात विभागली जातात व फळझाड पिकांना लवकर उपलब्ध होतात.

४. इंजेक्शनद्वारे खते देणे :-

 ही नविन पद्धती आहे यामध्ये जसे आपण आजारी पडल्यानंतर इंजेक्शन घेतो, तसेच या पद्धतीत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य फळझाडांच्या रोपांच्या नाजुक मुळांमध्ये व फांद्यांमध्ये इंजेक्शनद्वारे सोडले जाते.

महत्वाच्या कोरडवाहू फळपिकांचे खत व्यवस्थापन :-

  • सीताफळ :-

 

सीताफळाच्या झाडाला साधारणपणे नियमित खते दिली जात नाहीत, मात्र मोठ्या आकाराची फळे व भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी पावसाळा सुरू होताच सीताफळाच्या झाडाला १०-१५ किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे, लागवडीनंतर पहिली ४-५ वर्ष सीताफळाच्या प्रत्येक झाडास ७५-१०० ग्राम यूरिया द्यावा. ५ वर्ष व त्यापुढील प्रत्येक झाडास १५ किलो शेणखत, २५० ग्राम नत्र, १२५ ग्राम स्फुरद व १२५ ग्राम पालाश प्रती झाड याप्रमाणे द्यावे. त्यापैकी शेणखत, पूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र बहराच्या वेळी व उरलेला नत्राचा हप्ता फळधारणा होताच द्यावा.

  • आवळा :-

सप्टेंबर- ऑक्टोबर या महिन्यात प्रत्येक लहान झाडाला १५०-२० किलो व मोठया झाडांना ३०-४० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि प्रत्येक झाडाला १०० ग्राम नत्र, ५० ग्राम स्फुरद व १०० ग्राम पालाश प्रती झाड याप्रमाणे द्यावे. प्रती वर्ष झाडाच्या वाढीनुसार खतांच्या मात्रेमध्ये बदल करावा.

 

  • बोर :-

हे कोरडवाहू जमिनीतील मुख्य पिक असून बोरीचे पिक सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत घेतले जाते. हे पिक खताच्या मात्रेस चांगला प्रतिसाद देते. बोर पिकाच्या फाळझाडास १० ते १५ किलो शेणखत, १०० ग्राम नत्र, १०० ग्राम स्फुरद व १०० ग्राम पालाश प्रती झाड याप्रमाणे द्यावे. यामध्ये स्फुरद व पालाश यांचा संपूर्ण व नत्राचा अर्धा हप्ता जून महिन्यात द्यावा व उरलेला नत्राचा हप्ता फळधारणा झाल्यावर ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये द्यावा. खत देताना झाडाच्या मुख्य खोडापासून अर्धा मीटर आंतरावर आळी करून त्या मध्ये समप्रमानात पसरून द्यावीत.

  • चिंच :-

 चिंचेच्या झाडाची लागवडीनंतर सुरवातीच्या ५ ते ७ वर्षात चांगली जोमदार वाढ होऊन ती लवकरात लवकर फळावर यावी यासाठी रोपे १ वर्षाची झाल्यानंतर खते देण्यास सुरवात करावी. पाऊस पडताच जून – जुलैत शेणखत व मिश्रखते द्यावीत, त्यानंतर २१ दिवसांनी पावसाचा अंदाज घेऊन अमोनियम सल्फटे अथवा यूरिया द्यावा, त्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी पावसाचा अंदाज घेऊन नत्राचा दूसरा हप्ता द्यावा. ५ वर्ष व त्यापुढील प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत, ५०० ग्राम नत्र, २५० ग्राम स्फुरद व २५० ग्राम पालाश प्रती झाड याप्रमाणे द्यावे.

English Summary: Fertilizer management in dryland orchards
Published on: 17 April 2021, 03:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)