शेतकरी आपल्या शेतात वर्षभर राबत असतो, पीक बाजारात जाईपर्यंत त्याच्या पायाला पाय नसतो. असे असताना तो आपल्या पिकाची काळजी घेण्यासाठी काहीही करतो. सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. कधी अवकाळी तर कधी गारपीठ होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता उन्हामुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. उत्पादनावर याचा परिणाम होऊ नये म्हणून (Malegaon) मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्याने एक जुगाड केले आहे.
यामुळे या शेतकऱ्याची पंचक्रोशीत चर्चा सुरु आहे. डाळिंब उत्पादक सुरेश निकम यांनी 1 एकरातील झाडांना साडीचे आवरण घातले आहे. यामुळे उन्हापासून संरक्षण होत आहे. सध्या उन्हाचा फटका मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. तसेच पाणी पातळीतही घसरण झाल्याने बागा जोपासणे अवघड झाले आहे.
सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने याचा फटका डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे नुकसान होणार आहे. वाढत्या उन्हामुळे बागा सुकू लागल्या आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी निकम यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.मालेगाव दाभाडी येथील डाळींब उत्पादक सुरेश निकम यांनी नामी शक्कल लढवित चक्क डाळींब पिकांना साड्यांचे अच्छादन केले.
त्यांनी 15 ते 20 रुपयांना जुन्या साडया विकत घेतल्या. एक एकरातील 300 झाडांना त्यांनी साड्यांचे अच्छादन केले. त्यासाठी त्यांना 5 हजार रुपये खर्च आला आहे. सध्या डाळींब शेती अनेक कारणाने धोक्यात आली आहे. यामुळे बाजारपेठेत पुरवठा कमी असल्याने बाजारभाव चांगला मिळत आहे. यामुळे सध्या जेवढ्या बागा शिक्कल आहेत, त्या जगवण्यासाठी शेतकऱ्याची पळापळ सुरु आहे.
आता त्यांच्या या कल्पनेचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही होणार आहे. डाळिंब बागांचे संरक्षण करण्यासाठी इतर शेतकरीही हाच पर्याय निवडत आहेत. केवळ एक महिना बागांचे संरक्षण करायचे आहे. तसेच गारपीठ झाली तरी यामुळे काहीसे संरक्षण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
White Jamun; इंदापूरच्या पांढऱ्या जांभळाची राज्यात चर्चा, किलोला 400 रुपयांचा दर
248 एकर जमीन, एकराचा भाव २ कोटी तरी यशवंत बंद पडलाच कसा? वाचा खरी परिस्थिती..
शेतकरी राजांनो खरिप हंगामातील पीककर्जाची प्रक्रिया सुरु, असा घ्या लाभ, जाणून घ्या सर्वकाही..
Published on: 27 April 2022, 10:29 IST