Horticulture

शेतकऱ्यांना आंबा लागवड चांगली परवडू शकते. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे.

Updated on 04 March, 2022 5:45 PM IST

शेतकऱ्यांना आंबा लागवड चांगली परवडू शकते. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख टन उत्पादन मिळते. पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. कोय कलम, मृदूकाष्ठ कलम, व्हिनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करुन अभिवृद्धी करण्यात येते. आंबा लागवडी बाबत सविस्तर माहिती घेऊया.

 

मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. तसेच हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज या आंब्याचा जाती आहेत.

लागवड व खते –

१० X १० मी भारी जमिनीत

९ X ९ मी मध्यम जमिनीत

१ X १ X १ मी. आकाराचे खडे घेऊन शेपाखत (४० -५० किलो) + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट (२ किलो) मिश्रणाने भरा. एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद १०० ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्या. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासुन प्रत्येक झाड ५० किलो कंपोस्ट खत, १.५ किलो नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्या.

पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ – ४ पाण्याच्या पाळ्या द्या. आंबा बागेत १० वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

फळांची काढणी

आंबा फळे १४ आणे (८५ %) पक्वतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. 

तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता १.०२ ते १.०४ एवढी असावी. फळांची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढा.

३५० ग्रॅम, ३००- ३५१ ग्रॅम, २५१ ते ३०० ग्रॅम व २५० ग्रॅम पेक्षा कमी वजनाची अशी प्रतवारी करा. प्रतवारी झाल्यावर फळे ५०० पीपीएम कार्बनडेन्झिम (०.५ ग्रॅम कार्बनडेन्झिम १ लिटर पाण्यात ) च्या द्रावणात १० मि. बुडवा. त्यामुळे काढणीनंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर फळे पंख्याखाली वाळवून खोक्यामध्ये भरा.

English Summary: Farmers should cultivate mango in such a manner; Will get double income .
Published on: 04 March 2022, 05:45 IST