भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून मिळते. पपईचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी वापरण्यात येणारी टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार करण्यासाठी, तर पपईच्या पेपेनपासून औषधे, च्युईंगम तयार करतात.
पपई लागवड करण्यासाठी सुपीक, मध्यम काळी रेतीमिश्रीत पोयटा जमीन योग्य ठरते. जमीन काळी असल्यास पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक असते. तसेच मुख्य खोडाभोवती कायमस्वरूपी पाणी साठले नाही पाहिजे जमीन मध्यम ते रेती मिश्रित पोयटायुक्त असल्यास, पाणी साठव्याची पात्रता वाढवण्यासाठी योग्य कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे असते.
पपई फळपिकला यशस्वीरित्या उत्पादनासाठी सरासरी 15-30॰ सें तापमानाची आवश्यकता ठरते. पपई पिकासाठी जास्तीत जास्त तापमान 44॰ सें तर किमान 10॰ सें पर्यंत सहनशीलता असते. पपई पिक उष्ण कटिबंधात वाढणारे आहे.
शेतकऱ्यांना दिलासा! कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा, 30 दिवसात वाटप करण्याचे आदेश
पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जुने- जुलै, सप्टेंबर- ऑक्टोंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.
महाराष्ट्रात मुख्यत्वे लागवड जुन-ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते.
पपई लागवड कशी करावी:
पपई लागवड बियांपासून रोपे तयार केली जाते. साधारणत: 1 हे. क्षेत्रासाठी लागवड करण्यासाठी 250-300 ग्रॅम. बियाण्यांपासून रोपवाटिका तयार करावी. पपईची जात द्विलिंगी असल्यास जास्त बियाणे मात्राची आवश्यकता असते. जर जात उभयलिंगी असेल तर कमी बियाणे मात्राची आवश्यकता असते. द्विलिंगी जातींच्या झाडामध्ये 50% नर झाडाची आवश्यकता असते अशा वेळी वेळेस फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाडे उपटून टाकावी लागतात. म्हणून अशा ठिकाणी 2-3 रोपांची लागण करणे आवश्यक असते.
पपई रोपवाटिका तयार करणे:
पपई रोपवाटिका माध्यम तयार करण्यासाठी 5 किलो कोकोपिट+2.5 किलो पोयटा माती+अधिक कुजलेल शेणखत+100 ग्रॅम ट्रायकोडर्मा+100 ग्रॅम. 19:19:19 खत या प्रमाणात मिश्रण एकजीव करून ते ट्रे किंवा पॉलीथीन बॅगमध्ये भरून द्यावे. तसेच या माध्यमामध्ये बिया 1.5 सें.मी खोलीवर टोकाव्यात. बियाणे टाकल्यानंतर अलगत झाकून टाकावे व झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. तसेच रोपे (पॉलीथीन बॅगमध्ये किंवा ट्रे) शेडनेट मध्ये ठेवावेत.
शेतकऱ्यांनी काळजी घ्या! राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता...
पपई लागवडीपूर्वी जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी. कुळवाने वखरपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत व जमीन सपाट करून घ्यावी.
पपई लागवड 2.5 x 2.5 किंवा 2.25 x 2.25 मी अंतरावर करावी. पपई लागवडीसाठी दिड दोन महिन्याची रोपे वापरावीत.
शास्त्रज्ञांनी विकसित केला गीर गाईचा 'देसी क्लोन', आता गावागावात दूध उत्पादन वाढणार
भाजपचे ज्येष्ठ नेते पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन
राज्यात १ एप्रिलपासून वीज महागाईचा शॉक! मोजावे लागणार जास्तीचे पैसे..
Published on: 29 March 2023, 04:24 IST