कांदा हे अनेक शेतकऱ्यांचे मुख्य पीक, अनेकदा यामधून अनेक शेतकरी लखपती होतात, तर अनेक शेतकरी मोठा तोटा सहन करतात. असे असताना अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात मात्र कांदा जास्त दिवस साठवून ठेवता येत नसल्याने त्यांना अनेकदा बाजारभाव नसताना देखील तो विकावा लागतो. उन्हाळी कांदा टिकतच नाही त्यामुळे काढणी, छाटणी झाली की लागलीच विक्री हे ठरलेले सूत्र आहे.
आता मात्र यावर पर्याय काढला आहे. आता आठ ते नऊ महिने कांदा आपल्याला साठवता येणार आहे. घोडेगावच्या माऊलीने हा पर्याय काढला आहे. यामुळे आता जेव्हा जास्त बाजारभाव असेल तेव्हाच विक्री करत येणार आहे. आता कांदा काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा (Onion Seed) बियाणांचा त्यांनी शोध घेतला. यासाठी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि (KVK) केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास त्यांनी केला.
केव्हीके येथील ‘भीमा शक्ती’चे बियाणेच उत्पादन वाढीचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे. वाढीव दर मिळताच विक्री करण्याचा पर्याय माऊलीकडे असल्याने यामधून विक्रमी उत्पन्न मिळेल असा त्यांचा दावा आहे. यामुळे येणाऱ्या काळात इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.
कांदा काढणीनंतर तो 2 ते 3 महिने टिकून राहतो, नंतर मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा परस्थितीमध्ये दर कमी-जास्त झाला तरी त्याची परवा न करता शेतकऱ्यांना कांदा हा विकावाच लगतो. त्यामुळे उत्पादन वाढणे महत्वाचे नाही तर उत्पादित झालेल्या कांद्याचे नियोजन महत्वाचे आहे. यामुळे आता पुढील काही दिवसांनंतर जास्त दिवस टिकेल आणि दर्जा कमी होणार नाही, असा कांदा बाजारात येईल.
ताज्या बातम्या;
ज्याची शेतकऱ्यांना भीती होती तेच झाले, आता लाखाचे होणार बारा हजार; केंद्राच्या निर्णयाने शेतकऱ्यांना धक्क
दुग्धव्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, मग नाही कसल्याही नोकरीची गरज
काय सांगता! गायींना गाणी ऐकवली तर दूध जास्त देतात? खरी माहिती आली समोर..
Published on: 30 March 2022, 03:03 IST