Horticulture

शेतीमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन जाती शोधल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षेच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचं नवीन वाण विकसित केलेय. शशीदर पोतदार, रवींद्र पोतदार असे या दोन भावांची नावे आहेत. या दोघांनी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाचं नवीन वाण विकसित केलं आहे.

Updated on 20 December, 2022 4:34 PM IST

शेतीमध्ये नवनवीन बदल घडत आहेत. शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन जाती शोधल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षेच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचं नवीन वाण विकसित केलेय. शशीदर पोतदार, रवींद्र पोतदार असे या दोन भावांची नावे आहेत. या दोघांनी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाचं नवीन वाण विकसित केलं आहे.

शिवाय केंद्र सरकारचे या सिद्ध गोल्डन नावाने पेटंट देखील मिळवले आहे. आता आपल्या 2 एकरात या पोतदार बंधूनी या सिद्ध गोल्डन जातीच्या वाणाची लागवड केलीय.

जाडी आणि लांबी भरपूर, मनी ड्रापिंग कमी तसेच इतर द्राक्षच्या जातीपेक्षा या सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षाना मिळणारा जादा दर , किंबहुना दुप्पट दर मिळतोय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे सिद्ध गोल्डन नावाचे नवीन द्राक्षचे वाण फायदेशीर ठरणार आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर येथील रवींद्र आणि शशिन्द्र पोतदार या बंधूंनी द्राक्षाची ‘सिद्ध गोल्डन’ ही नवी जात विकसित केली आहे. त्याचे स्वामित्वहक्क (पेटंट)देखील मिळविले आहेत.

पारंपरिक जातींपेक्षा अधिक दर्जेदार असणारे हा वाण बाजारात दुप्पटीने दर मिळवत आहे. पोतदार बंधू २० वर्षांपासून द्राक्षशेती करतात. चार एकर बागेत सुपर सोनाक्का जातीसह नेहमीच्या जातींची द्राक्षे पिकवतात.

सुमारे दोन वर्षांपूर्वी एका द्राक्षवेलीवरील काही काड्या आणि द्राक्षमणी वेगळेच असल्याचे त्यांना जाणवले. त्या काड्या बाजूला काढून स्वतंत्र लागवड केली.

अन्य वेलींसोबतच त्यांचीही छाटणी, औषध फवारणी, डोळेभरणी, डिपिंग आदी कामे केली. फुलोऱ्यानंतर द्राक्षमणी तयार झाले, तेव्हा वेगळेपणा स्पष्ट जाणवला. आकार, लांबी, गोडी, रसाचे प्रमाण, घडाला घट्ट धरून राहण्याची क्षमता या सर्वच बाबतीत ती द्राक्षे दर्जेदार असल्याचे आढळले.

PF Balance: नवीन वर्षाच्या आधी EPFO ​​ने जारी केला अलर्ट! आता...

सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षाच्या जातीची वैशिष्ट्ये

- रसाळ आणि गोड, गरही भरपूर
- जास्त लांबी, टोकाला आकर्षक गोलाई
- बाकी जातीच्या द्राक्षापेक्षा सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षला जास्त दर मिळतो
- घडाला धरून राहण्याची क्षमता
- चमकदार आणि तजेलदार हिरवा रंग

LPG Cylinder : 500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

English Summary: Farmer brothers of Sangli discovered a new grape variety
Published on: 20 December 2022, 04:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)