Horticulture

ड्रॅगन फ्रुट म्हणजेच कमलम आपल्याला माहित आहे. तंतुमय पदार्थ आणि खनिजांनी समृद्ध असे परदेशी वैशिष्ट्यपूर्ण फळाची महाराष्ट्रातील दुबईला निर्यात केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील तडसर इथल्या शेतकऱ्यांनी निर्यातक्षम ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन घेतले आहे. तसेच ज्या ड्रॅगन फ्रुट चे प्रक्रियेचे आणि आवरणाचे काम अपेडा मान्यताप्राप्त निर्यातदार एम/एस के. बी. यांनी केले आहे.

Updated on 28 June, 2021 11:28 AM IST

 ड्रॅगन फ्रुट म्हणजेच कमलम आपल्याला माहित आहे. तंतुमय  पदार्थ आणि खनिजांनी समृद्ध असे परदेशी वैशिष्ट्यपूर्ण फळाची महाराष्ट्रातील दुबईला निर्यात केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील तडसर इथल्या शेतकऱ्यांनी निर्यातक्षम ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन घेतले आहे. तसेच ज्या ड्रॅगन फ्रुट चे प्रक्रियेचे आणि आवरणाचे काम अपेडा मान्यताप्राप्त निर्यातदार एम/एस के. बी. यांनी केले आहे.

ड्रॅगन फ्रुट प्रामुख्याने मलेशिया, फिलिपाईन्स, अमेरिका, थायलंड आणि वियतनाम या देशांमध्ये प्रामुख्याने पिकवली जातात. आपल्या भारतात 1990 च्या सुरुवातीला ड्रॅगन फूड चे उत्पादन घ्यायला पहिल्यांदा सुरुवात झाली. आता आपल्याकडे विविध राज्यातील बरेच शेतकरी ड्रॅगन फ्रुट ची लागवड करू लागले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यात येते. ड्रॅगन फ्रुट चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे फळपीक कमीत कमी पाण्यात आणि मातीच्या कुठल्याही प्रकारात उत्तम येते. या फळाचे प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात.

 पहिला म्हणजे सफेद गर आणि गुलाबी साल असलेले, दुसरा प्रकार म्हणजे लाल गर आणि गुलाबी साल असलेले, आणि तिसरा प्रकार म्हणजे सफेद गर आणि पिवळी साल असलेले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमांमधून जुलै दोन हजार वीस मध्ये गुजरातमधील कच्छ भागात होत असलेल्या ड्रॅगन फ्रुट शेती चा उल्लेख केला होता. शेतीक्षेत्रातील आत्मनिर्भरता सुनिश्चित करण्यासाठी ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली म्हणून कच्छ च्या  शेतकऱ्यांचे पंतप्रधान लिहा अभिनंदन केले होते.

 या फळाचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. जसे की, या फळात खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. ऑक्सीडेटिव्ह ताणामुळे शरीरातील पेशींचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उपयुक्त आहे. दाह कमी करणे आणि पचन व्यवस्था सुधारणे या कामी ड्रॅगन फ्रुट उपयोगी आहे.

या फळात कमलम असेही  संबोधतात. ड्रॅगन फ्रुट चे निर्यातीला पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास आणि बाजारपेठांचा विकास अशा विविध घटकांतर्गत निर्यातदारांना सहकार्य करत अपेडा कृषी आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा निर्यातीला प्रोत्साहन देते. तसेच वाणिज्य विभागही मिरचीसाठी च्या व्यापार पायाभूत सुविधा, बाजारपेठेत प्रवेशासाठी पुढाकार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निर्यातीला पाठबळ देत आहे.

English Summary: export of dragon fruit
Published on: 28 June 2021, 11:28 IST