सध्या हिवाळा सुरू आहे आणि पावसाळा अनुभवायला भेटत आहे तर दुसऱ्या बाजूस पाहायला गेले तर आताच्या दिवसात आंब्याला मोहर लागतो पण त्याऐवजी आता पालवी फुटत आहे. यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पूर्ण खरीप हंगाम वाया गेला तर आता अवकालीमुळे फळबागा धोक्यात आहेत. मोहर लागल्यानंतर आंब्याला कैऱ्या लागतात तर वातावरणामुळे आता आंब्याला पालवी फुटली आहे. आंब्याचा हंगाम तर आता लांबणीवर पडलेला आहेच परंतु त्यात आता घट सुद्धा पाहायला भेटणार आहे.
म्हणून मोहोर लांबणीवर:-
यावर्षी निसर्गाच्या अनियमितपणामुळे आंब्याला मोहर न लागता पालवी फुटायला लागली आहे. आंब्याला मोहर लागण्यासाठी झाडाच्या मुळाला पाण्याचा ताण पडणे गरजेचे असते. जो की दरवर्षी झाडाच्या मुळाला ताण तरी पडतो आणि नंतर कलम केला की मोहोर लागतो पण आता डिसेंबर जरी उजाडला तरी सुद्धा मोहोर लागलेला नाही.
उत्पादनात घट अन खर्चात वाढ:-
वातावरणात झालेल्या बदलामुळे फळबागांवर परिणाम झाला आहे जे की हे न भरून निघणारे नुकसान आहे. या अवकाळी पाऊसामुळे पुन्हा औषधे फवारणीमध्ये खर्च वाढलेला आहे.पाऊस उघडला की कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र करून फवारणी करावी लागते तरच फळ भेटते. यावर्षी खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी:-
प्रत्येक वर्षी वातावरणात बदल झाल्यामुळे कोकणातील फळबागांवर परिणाम असतो जे की आता आंबा आणि काजू च्या बागेला धोका आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे आणि याची नुकसानभरपाई शेतकरी मागत आहेत.
कोकणचा वाली कोण?
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा मध्ये नैसर्गिक आपत्ती आली की अनेक लोक मदतीसाठी पुढाकार घेतात. मात्र कोकनातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणताही शेतकरी पुढे येत नाही.
आवक वाढली तर दरही घटणार:-
दरवर्षी मार्च महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होतो मात्र यावर्षी फक्त ६० दिवसांचा हंगाम राहणार आहे जो की एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. यामुळे बाजारात अचानक आंब्याची आवक वाढणार आहे आणि याच परिणाम दरावर होणार आहे.
Published on: 09 December 2021, 06:40 IST