जी गोष्ट महाग ती आपण खरेदी किती प्रमाणात करायची हे ठरवतो ना अगदी तेच येथे करायचे. बदाम, पिस्ते, काजू हे खरेदी करतांना 1/2 किलो खरेदी केले जात नाही. गरज आणि बजेट पाहूनच खरेदी वस्तू खरेदी केल्या जातात.
दरवाढ रासायनिक खतांचा कमी वापर व्हावा हाच यामागील हेतू असेल, जरी हा प्रामाणिक हेतू नसला तरी आपण त्याचे सोनं करायला पाहिजे. रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनी नापिक होऊ लागल्या,
बैलाने नांगरट होणारी आपली शेती आज 50/70 हॉर्सपॉवर ट्रॅक्टरने देखील व्यवस्थित नांगरट होत नाही. दोष यंत्राचा नाही शेतकरी बुध्दीचा आहे. आपल्याला खत 1 किलो सांगितले तर आपण 5/10 किलो वापरतो. मग एवढं खत पिकाने घेतले का ? राहीलेल्या खताचे काय झाले असेल याचाही विचार व्हायला हवा.
जसे जमिन, वनस्पती, प्राणी यांचे चक्र चालते तसेच माणसाचे आहे. मानवी शरीराला आवश्यक आणि गरज असेल तेवढेच शरीरात गेले पाहिजे अन्यथा इतर भयंकर गंभीर आजारांना आमंत्रण चालू होते.
निसर्गापुढे कोणाचाच टिकाव लागला नाही आणि लागू दिला जाणार नाही हे स्पष्ट मत आहे. किती गाजावाजा करणारे सध्या घरात बसूनच आहे ना.
निसर्गाने भरपूर शिकवले पण शिकण्याची आवड गरज वाटली पाहिजे. शेतकरी रासायनिक खते वापरतो म्हणून कंपन्या खते तयार करून दुकानदारामार्फत विक्री होते.
यापुढे शेतकरी पहा काटेकोरपणे शेती करायला शिकेल हीच काळाची गरज आहे.
शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे आली असे दिसत असले तरी मागास आहे. कारण शेतक-यांना मार्गदर्शन महत्वाचे आहे. हे शेतक-यांनी स्विकारत इतरही मार्गांचा अवलंब केला तर शेती नफ्यात वाढ देईल.
जसे जमिन, वनस्पती, प्राणी यांचे चक्र चालते तसेच माणसाचे आहे. मानवी शरीराला आवश्यक आणि गरज असेल तेवढेच शरीरात गेले पाहिजे
विचार पटतीलच असे नाही पण सत्य आहे ते स्विकारले पाहिजे.
Published on: 02 March 2022, 07:30 IST