Horticulture

अमरावती मध्ये पिकणारी संत्री म्हणजे विदर्भाचा कॅलिफोर्निया, पाहायला गेले तर सध्या वातावरणामध्ये संत्रा फळाला आंबिया बहार आला आहे परंतु संत्रा या फळावर सध्या तडक्या या रोगाचा प्रादुर्भाव पडल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे कारण या रोगामुळे संत्रा फळाची गळती चालू झाली आहे. कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वेळवर योग्य ते मार्गदर्शन भेटत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Updated on 16 July, 2021 2:26 PM IST

सत्रा हे फळ आपल्या सर्वांना आवडते जे की संत्री फळ चवीला थोडे आंबट व थोडे गोड. अमरावतीमध्ये सर्वात जास्त संत्रा फळाचे पीक घेतले जाते म्हणून या भागाला विदर्भाचे कॅलिफोर्निया असे म्हणले जाते. अमरावतीमधील संत्री देश विदेशात विकले जातात पण सध्याच्या वातावरणात संत्रा फळावर तडक्या रोग पडल्यामुळे संत्रा फळाला गळती चालू झालेली आहे आणि त्यावरती भेगा सुद्धा पडत आहेत.

हेही वाचा:डाळिंबाचे फळ तडकण्याची कारणे आणि त्यावरील उपाय योजना

कृषी विभागाचं संत्री उत्पादकांना मार्गदर्शन गरजेचं:

तडक्या रोगामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे २५ ते ३० टक्के नुकसान झालेले आहे असे दिसून येत आहे. कृषी विभागाने संत्रा उत्पादकांना वेळेवर जर मार्गदर्शन नाही केले तर शेतकऱ्यांना जास्त नुकसान होण्याची भीती वाटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे कारण जर शेतकऱ्यांना योग्य वेळेवर मार्गदर्शन नाही केले तर शेतकऱ्यांचे पूर्ण पणे नुकसान होईल.

तडक्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा फळाच्या उत्पादनात घट:

मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडॉन पडल्यामुळे संत्रा फळाचे भाव घसरले तसेच यावेळी संत्रा पिकावर तडक्या रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने उत्पादनात घट होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची संत्री उत्पादक शेतकऱ्यांना खूप गरज आहे कारण सध्या रोगामुळे संत्रा पिकाची गळती चालू आहे. मात्र कृषी विभाग संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन करत नसल्याचे शेतकऱ्यांनी आरोप लावले आहेत.

English Summary: disease on orange fruit trees, 25 to 30 per cent loss to farmers
Published on: 16 July 2021, 02:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)