Horticulture

लिंबू वर्गीय पिके अन्नद्रव्यांच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात. लिंबूवर्गीय फळझाडांमध्येअन्नद्रव्यांची कमतरता जर भासली तर त्याची लक्षणे पाने,फुले आणि वाढीवर लगेच दिसतात.लक्षणे तात्काळ ओळखून योग्य उपाययोजना करणे आवश्येक असते.या लेखात आपण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता व त्यासाठी करावयाची उपाययोजना याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 03 December, 2021 4:32 PM IST

लिंबू वर्गीय पिके अन्नद्रव्यांच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात. लिंबूवर्गीय फळझाडांमध्येअन्नद्रव्यांची कमतरता जर भासली तर त्याची लक्षणे पाने,फुले आणि वाढीवर लगेच दिसतात.लक्षणे तात्काळ ओळखून योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक असते.या लेखात आपण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता व त्यासाठी करावयाची उपाययोजना याबद्दल माहिती घेणार आहोत.

लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता व उपाययोजना

  • नत्र- नत्र हे अन्नद्रव्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या अन्नद्रव्यांमुळेइतर अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. यामुळे झाडांची वाढ जोमदार होते तसेच बहार येण्यासाठी नत्राची आवश्‍यकता असते. बहार येताना पानातील नत्र हे फुलांमध्ये जाते. फुले टिकून राहतात व फळधारणा चांगली होते.

कमतरतेची लक्षणे

 पाने पिवळी किंवा फिक्कट पिवळी पडतात. पानाच्या शिरा सुद्धा पिवळ्या पडतात. झाडाच्या डहाळ्या वाळण्यास सुरुवात होतो.झाडांची वाढ खुंटते, फळांचा आकार लहान होतो तसेच झाडाचे एकूण आयुष्य कमी होते. कधीकधी कमतरता असलेल्या झाडावर प्रमाणापेक्षा जास्त बहार येतो व जास्त प्रमाणात फळगळ होते.

नत्राचा पुरवठा साठी उपाययोजना

  • चांगले कुजलेले शेणखत 50 किलो प्रति झाड द्यावे.
  • नत्राची शिफारस खत मात्रा दरवर्षी झाडांना द्यावी.
  • कमतरता दिसल्यास एक टक्के युरियाची फवारणी करावी त्वरित परिणाम मिळतात.
  • हिरवळीचे खत तयार करणारी पिके घेऊन जमिनीत गाडावीत.

स्फुरद

याच्या कमतरतेमुळे पाने करड्या किंवा फिक्कट हिरव्या रंगाची दिसतात. जुनी पाने खाली पडणे अगोदर वेडी वाकडी होतात.  पक्व झालेली फळे मऊ आणि ओबडधोबड होतात.झाडाची वाढ खुंटते.पानांची गळ होऊन पाने विरळ होतात तसेच बहराची फुलेतुरळक येतात.कळ्या सुप्तावस्थेत राहूनसुकतात.फळधारणा कमी होते व फळांची प्रत बिघडते.

उपाययोजना

 स्फुरदाची योग्य मात्रा दरवर्षी झाडांना द्यावी.स्फुरदाची कमतरता दिसून आल्यास पाने व जमिनीचे पृथक्करण करून घ्यावेव त्यानुसार खते द्यावीत.

पालाश

वनस्पतीच्या पेशींच्या विभाजनासाठी पालाशची गरज असते.पालाश मुळे झाडात कडकपणा येतो. झाड रोगास व किडीस बळी पडत नाही. झाडाची पाण्याचा ताण व कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता वाढते.पालाश हा नवती मध्ये जास्त असतो. पुढे पानांमधून परिपक्व फळांमध्ये जातो.फळांची प्रत सुधारते व उत्पादनात वाढ होते

पालाशच्या कमतरतेची लक्षणे

 संत्रा झाडाची पाने पीळल्या सारखी वेडीवाकडी व सुरकुत्या पडल्या सारखे होतात. शेंड्याची वाढ थांबतो. झाडे खुरटलेल्या सारखे होतात. पानांचा रंग पिवळा ते तपकिरी फळांचा आकार लहान होतो.

उपायोजना

पालाशची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये पोटॅशियम सल्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करावा. झाडावर पोटॅशियम नायट्रेटची एक टक्के फवारणी करावी. आपल्याकडील जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण भरपूर असले  तरी ते उपलब्ध स्वरूपात नसते.परिणामी वर खतातून ती गरज भागवावी लागते. त्याचप्रमाणे पालाशच्या अधिक्य असलेल्या जमिनीत जस्त, मॅग्नेशियम आणि  मॅग्नीज  ची कमतरता भासते.

English Summary: dificiency of micronutrients in citrus fruit and management
Published on: 03 December 2021, 04:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)