Horticulture

दशपर्णी अर्क हे नैसर्गिक कीटकनाशक असूनहेशेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ शकतो.रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास ते आरोग्यास खूप हानिकारक आहे

Updated on 26 February, 2022 7:50 PM IST

दशपर्णी अर्क हे नैसर्गिक कीटकनाशक असूनहेशेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ शकतो.रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास ते आरोग्यास खूप हानिकारक आहे

त्यामुळे जर आरोग्यावर होणारे वाईट परिणाम व शेतीचा खर्च कमी करण्यासाठी नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी या दशपर्णी अर्काचा वापर कीटकनाशक म्हणून केला पाहिजे

 भारत सरकारच्या किटकनाशक बंदी कायद्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी हे जैविक कीटकनाशक स्वतः तयार करावे.

  • कृती:

येथे तयार करण्यासाठी खर्च फक्त 6 रुपये आहे.व 16 लिटर पंपासाठी फक्त 200 मिली घेणे आहे. एका पंपासाठी खर्च 2 रुपये याची माहिती खालील प्रमाणे

 कीटकनाशक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 200 लिटर टाकी
  • कडूनिंब व निंबोळ्या पाला - 5 किलो
  • रुई पाला 2किलो
  • धोतरा पाला -2 किलो
  • एरंडपाला - 2 किलो
  • बिलायत पाला - 2 किलो
  • गुळवेल पाला - 2  किलो
  • निरगुडी पाला -2 किलो
  • घाणेरी पाला – 2 किलो
  • कनेरी पाला - 2 किलो
  • करंजी पाला – 2 किलो
  • बाभूळ पाला – 2 किलो
  • बेशरम पाला - 2 किलो
  • सीताफळाचा पाला – 2 किलो
  • पपई चा पाला – 2 किलो

यापैकी कडूनिंब गारवेल रुई करंजी सीताफळाचा पाला महत्वाचे बाकीचे सर्व उपलब्ध असतील त्यानुसार घेणे सर्व मिळून10वनस्पती घेणे गरजेचे आहे. हे सर्व 200 लीटर टाकीमध्ये पाणी घेऊन त्यात वरील सर्व वनस्पती बारीक करून घेणे साधारण वीस दिवस घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळणे.

 30 दिवसानंतर उग्र वास आल्यानंतर 16 लिटर पाण्याला 200 मिली फवारणी साठी वापरता येईल.

कीटकनाशक मावा, तुडतुडे, थ्रिप्स, अळीयांच्यावर प्रभावी काम करते. याची फवारणी शक्यतो दर आठ दिवसाला करावी.

  • प्रमाण:

 16 लिटर पंपासाठी 200 मिली

 याचबरोबर काही जिवाणू तसेच बुरशी प्रमाणित प्रयोगशाळेतून आणावे लागतात.

 उदा. व्हर्टिसिलियम लूकानी,बिव्हेरिया, मायक्रोराईजा, मेटारायझियम. यांची विक्री दर वेगळे उपलब्ध आहेत.( प्रयोगशाळे वर अवलंबून आहे )

 अशाप्रकारच्या निविष्ठा वापरल्यास खर्चात बचत होते व उत्पादनात दोन टक्के वाढ होते. हा माझा अनुभव आहे मित्रहो निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिले आहे त्याचा वापर करणे हे आपल्याच हाती आहे.

मला एक सांगा रासायनिक शेती आपल्या खिशाच्या बाहेरचा विषय होऊन बसला आहे. म्हणून म्हणतो जैविक शेती करा, विषमुक्त शेती करा, नैसर्गिक शेती करा कारण की हाच विषय खिशाला आणि आरोग्याला सांभाळतो.

 त्यासाठी स्वतः बनविणे शिका कोणत्याही रासायनिक किंवा जैविक किंवा सेंद्रिय कंपनीकडून स्वतःची किंवा आपल्या मित्राची लूट होऊ देऊ नका सर्व शेतकरी बांधवांना पर्यंत हि माहिती पोहचवा ही विनंती.

English Summary: dashparni arc is benificial natural insecticide and making process of dashparni arc
Published on: 26 February 2022, 07:50 IST