Horticulture

शेतकरी राजांनो आपल्यालाही शेती परवडत नाही असे वाटते का? अहो मग तुम्ही फळबाग लागवड करा, आणि कमवा बक्कळ पैसा! तुम्हाला जर फळबाग लावायचा असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी, आज कृषी जागरण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी थाई अँपल बोरच्या लागवडीची माहिती घेऊन आले आहे.

Updated on 13 November, 2021 3:17 PM IST

शेतकरी राजांनो आपल्यालाही शेती परवडत नाही असे वाटते का? अहो मग तुम्ही फळबाग लागवड करा, आणि कमवा बक्कळ पैसा! तुम्हाला जर फळबाग लावायचा असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी, आज कृषी जागरण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी थाई अँपल बोरच्या लागवडीची माहिती घेऊन आले आहे.

जर आपण अँपल बोर ची लागवड केली तर यातून आपण चांगली मोठी कमाई करू शकतात. बाजारात अनेक बोर उपलब्ध आहेत पण या सर्वात, सगळ्यात जास्त मागणी हि थाई अँपल बोर ची असते. बोरीची हि जात चवीला इतर बोरींपेक्षा अधिक चविष्ट असल्याचे सांगितलं जाते, हि बोर आंबट-गोड अशी असते. चवीला तर छान असतेच शिवाय ह्या बोरिमध्ये अनेक पोषकतत्वे असतात जे की आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे थाई अँपल बोरची मागणी हि खुप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणूनच या जातीच्या बोरीची लागवड करून शेतकरी बांधव चांगली तगडी कमाई करू शकतात.

थाई अँपल बोरविषयी अल्पशी माहिती

थाई अँपल बोरला शेतकऱ्यांचे सफरचंद म्हणुन देखील ओळखले जाते. हे एक हंगामी फळबाग पिक आहे. हे फळ मूळचे थायलंडचे, त्यामुळे याला थाई अँपल बोर ह्या नावाने ओळखले जाते. ह्या अँपल बोरचा आकारहा अँपल सारखा असतो तसेच हे फळ खुपच चमकदार असते. थाई अँपल बोरला आपल्या भारतीय उपखंडातील हवामान खुप मानवते. आपल्या साध्या बोरपेक्षा हे अँपल बोर आकाराने मोठे असते.

बोरीची हि नवीन जात बाजारात आल्यापासून शेतकऱ्यांच्या याच्या लागवाडीकडे कल हा वाढत चालला आहे. थाई अँपल बोरची लागवड हि संपूर्ण भारतभर थोड्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील याची लागवड बऱ्यापैकी केली जात आहे आणि शेतकरी याला डाळिंबाचा पर्याय म्हणुन देखील पाहत आहेत. याच्या एका झाडापासून 40 ते 50 किलो पर्यंत उत्पादन हे मिळू शकते, म्हणुन याची लागवड शेतकरी बांधव मोठया प्रमाणात करतांना दिसत आहे.

 थाई अँपल बोर लागवडीविषयी महत्वपूर्ण बाबी

»थाई अँपल बोरची लागवड हि संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. ह्याची लागवड हि कुठल्याही शेतजमिनीत सहज रीत्या करता येऊ शकते आणि त्यापासून चांगले उत्पादन देखील घेता येऊ शकते. याची लागवड हि फक्त ज्या जमिनीत पाणी साचते अशा ठिकाणी करणे टाळावे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या थाई अँपल बोरच्या रोप तयार करण्यासाठी कोणतेही बी नसते, तर याचे रोप हे कलम पद्धतीने लावले जाते.

रोपवाटिकांमध्ये म्हणजेच नर्सरीमध्ये थाई अँपल बोरच्या एका रोपाची किंमत हि जवळपास 30-40 रुपयांच्या दरम्यान असते. शेतकरी मित्रांनो जास्त आर्द्रता असलेल्या भागात याची लागवड करू नये. कलम पद्धतीने तयार केलेले हे झाड संकरित प्रजातीचे असते, ज्यांचे मूळ हे देशी म्हणजे गावठी असते आणि खोड हे संकरित असते.

»या थाई अँपल बोरची लागवड वर्षातून दोनदा जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात तसेच फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात करता येते.

»थाई अँपल बोरच्या लागवडीसाठी खर्च हा सुरुवातीला जास्त असतो, पण लागवड झाल्यानंतर एक वर्षानी खर्च हा कमी व्हायला सुरवात होते. साधारणपणे वर्षभरानंतर थाई अँपल बोरला बोरी ह्या येऊ लागतात. थाई अँपल बोरचे झाड एकदा लावल्यानंतर 20 वर्षेपर्यंत फळ देते. सुरुवातीला एका झाडापासून 30 ते 40 किलो उत्पादन मिळते, जे नंतर 100 किलोपर्यंत पोहोचते.

English Summary: cultivation process of thai apple red date and management
Published on: 13 November 2021, 03:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)