भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ह्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रात मोलाचा वाटा आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्र हा आपल्या गौरवपूर्ण इतिहासासाठी पूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे, एवढेच नाही तर आता कृषी क्षेत्रात आपले योगदान देऊन आपल्या देशाची अर्थाव्यवस्था बळकट करू पाहत आहे. महाराष्ट्र हा कांदाच्या उत्पादनासाठी, केळीच्या उत्पादनासाठी, द्राक्षे उत्पादनासाठी तर प्रसिद्ध आहेच पण आंब्याच्या लागवडीसाठीही प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र हा अल्फोन्सो आंब्याच्या उत्पादणासाठी खूपच प्रसिद्ध आहे. अल्फोन्सो आपण ज्याला हापूस ह्या नावाने ओळखतो, ह्या हापूसला जिआय टॅग पण देण्यात आला आहे.
आपल्या कोकणात विशेषता दक्षिण कोकणात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरात पिकवल्या जाणाऱ्या आंबाला सरकारने हा जिआय टॅग दिला आहे. जिआय टॅग म्हणजेच जिओग्राफिकल टॅग भेटल्याने ह्याला अजूनच प्रसिद्धी मिळाली आहे. महाराष्ट्रात हापूस आंबा हा अरबी समुद्रकिनारपट्टीच्या लगतच्या वीस किलोमीटर पर्यंत चांगले वाढतात. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात मध्ये देखील हापूसची लागवड केली जाते. विशेषता गुजरातच्या वलसाड आणि नवसारी ह्या जिल्ह्यातील हापूस उत्पादन लक्षणीय आहे. महाराष्ट्रात हापूस लागवड 4.85 लाख हेक्टर क्षेत्र लागवडिखाली आहे आणि 12.12 लाख मेट्रिक टन एवढे उत्पादन ह्यापासून महाराष्ट्रात होते.
हापूस आंबा लागवड करणारे शेतकरी सांगतात की हापूसची लागवड ही जून-जुलै ते सप्टेंबर पर्यंत उरकवून टाकावी. हापूस लागवडीसाठी पाण्याची पर्याप्त व्यवस्था असणे गरजेचे असते. हापूसला आंबे येण्यासाठी जवळपास त्यांच्या वेगवेगळ्या वरायटी नुसार 4-6 वर्ष लागतात. आंबा लागवडीत चांगली काळजी घ्यावी लागते आणि मगच हापूसच्या उत्पादनात शेतकरी यशाची शिखर गाठू शकतात. हापूसचे रोप हे जवळपास 100 रुपया पर्यंत नर्सरीत उपलब्ध असते किमतीत वेगवेगळ्या ठिकाणी बदल असू शकतो.
हापूस आंब्याच्या लागवडीसाठी जमीन कशी असावी
आंब्याची लागवड तसे पाहता सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते परंतु जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली पाहिजे, सुपीक खोल जमीन हापूस लागवडीसाठी योग्य मानली जाते. जमिनीचा पीएच मूल्य 5.5-7.5 दरम्यान असावा असा सल्ला दिला जातो. हापूस आंब्याच्या लागवडीसाठी आम्ही सांगितलेल्या ह्या गोष्टींची काळजी घ्यावी. म्हणजे आपणांस हमखास हापूस लागवडीतून चांगली कमाई होईल.
हापूस आंब्यासाठी खत व्यवस्थापन
कृषी शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा हापूस आंब्याचे झाड हे एक वर्षाचे असते तेव्हा त्याला 15 किलो कंपोस्ट, 150 ग्रॅम नायट्रोजन, 50 ग्रॅम फॉस्फरस आणि 100 ग्रॅम पोटॅश पावसाळ्याच्या सुरुवातीला द्यावे.
हेच प्रमाण दरवर्षी तितकेच वाढवले पाहिजे आणि दहव्या वर्षापासून जून महिन्यात प्रत्येक वनस्पतीला 50 किलो कंपोस्ट, 1.5 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद आणि 1 किलो पोटॅश द्यावे. जर अशा पद्धतीने हापूस आंब्याला खत खाद्य दिले गेले तर नक्कीच ह्यातून चांगले उत्पादन शेतकरी बांधव घेऊ शकतात.
Published on: 28 September 2021, 08:27 IST