Horticulture

सध्या शेतामध्ये, शेत तलावामध्ये उंदरांचा फार उपद्रव असल्याने आढळून येत आहे… उंदीर यामुळे शेतातील पिकांचे व आच्छादन कुरतडल्याने शेतकऱ्यांचे फार नुकसान होत असते… उंदीर हा अतिशय चपळ, चाणाक्ष व उपद्रवी प्राणी आहे.

Updated on 11 February, 2022 7:04 PM IST

सध्या शेतामध्ये, शेत तलावामध्ये उंदरांचा फार उपद्रव असल्याने आढळून येत आहे… उंदीर यामुळे शेतातील पिकांचे व आच्छादन कुरतडल्याने शेतकऱ्यांचे फार नुकसान होत असते… उंदीर हा अतिशय चपळ, चाणाक्ष व उपद्रवी प्राणी आहे.

उपद्रवी उंदरांचे नियंत्रण

सर्वप्रथम शेतातील सर्व बिळांची पाहणी करावी.बिळाच्या तोंडाला थोडेसे गवत ठेवावे किंवा बिळांची तोंडे चिखलाने किंवा मातीने बंद करून घ्यावेत दुसऱ्या दिवशी यांपैकी ज्या बिळाच्या समोरील गवत विस्कळीत दिसेल किंवा जी बिळेउघडे दिसतील त्यात उंदरांचे अस्तित्व आहे असे समजावे.उंदरांना आकर्षित करण्याकरता गव्हाची कणिक किंवा इतर कोणत्याही धान्याचा जाडाभरडा व त्यात थोडेसे गोडेतेल मिसळून विष  मिसळता थोडे थोडे मिश्रण आमिष म्हणून एक दोन दिवसबिळासमोर ठेवावे. किंवा बिळामध्ये टाकावे…

चटक लागण्यासाठी हे करावे…तीसर्या दिवशी सायंकाळी बिळा समोर किंवा बिळामध्ये झिंक फॉस्पराइड पॉयझनबॉईटचा वापर करावा…एक किलो झिंक फॉस्पराईड पॉयझन बाईट तयार करण्यासाठी एक किलो गव्हाचे कणिक किंवा इतर कोणत्याही धान्याचा जाडा भरडा घेऊन त्यात 20 ते 25 ग्रॅम झिंक फॉस्फाईड चांगल्या प्रकारे मिसळून लाइट्स तयार करून घ्याव्यात…बाजारात मिळणारा मैदा, गव्हाचे पीठ वापरून बनवलेल्या गोड बिस्किटांचा ही वापर यासाठी केला जाऊ शकतो…झिंक फॉस्फाईड हे विषारी रसायन ही बाजारात सहज उपलब्ध होते प्रत्येक बिळासाठी साधारणपणे 1-2 बाईट्स वापरून पालापाचोळा किंवा गवत टाकून ते झाकून घ्यावेत… दुसऱ्या दिवशी शेतात जे मेलेले उंदीर सापडतील ते गोळा करून खड्ड्यात पुरून टाकावेत…

बाईटसचा पुन्हा लगेच वापर न करता पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर परत वापर करावा… अशा प्रकारे संपूर्ण उंदरांचे पूर्ण नियंत्रण होईपर्यंत हे उपाय योजना करावी…झिंक फॉस्फाईड हे उंदरांप्रमाणेच इतर प्राण्यांसाठी घातक असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करावा… तसेच हे विषारी बाईड्स बनवताना हातात हात मोजे घालावेत, आवश्यक इतर सर्व काळजी घ्यावी… शेततळ्या भोवती गिरीपुष्प या वनस्पतींची लागवड केल्यासही  उंदीर दूर राहतात…

English Summary: control of rat in farm and farm pond take important information
Published on: 11 February 2022, 07:04 IST