पुरंदर तालुक्यातील अंजीर हे चवदार आहेच. जे की या अंजिराची युरोपात निर्यात करण्यासाठी यश आले आहे. प्रथम प्रयोग करण्यासाठी १० किलो अंजीर निर्यात करण्यात आले. इतिहासात प्रथमच अंजिराची निर्यात यशस्वीपणे झालेली आहे जे की भविष्यात निर्यात वाढली तर अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ खुली होणार आहे. निर्यात वाढल्यास पुरंदरचे अंजीर हे स्पेन, टर्की तसेच दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या देशासोबत स्पर्धा करेल.
पुरंदरचे अंजीर युरोपातील बाजारपेठेत :-
पणन मंडळाचे संचालक सुनील पवार यांनी काही माहिती सांगितली त्यामध्ये ते म्हणाले की पुरंदर तालुक्यात मोठ्या क्षमतेने आणि दर्जदार अंजीर उत्पादन भेटते. परंतु अंजिराची टिकवणं क्षमता कमी असल्याने देशात मोठी बाजारपेठ मिळत न्हवती. मात्र आता पुरंदरच्या अंजिराला भौगोलिक मानांकन भेटला आहे. कृषी पणन मंडळाच्या वतीने राज्यातील जीआय प्राप्त बाजरपेठा व निर्यातवृद्धी योजना राबविण्यासाठी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. या योजनेतुनच पुरंदरचे अंजीर युरोपात पाठवणे शक्य झाले आहे. युरोपातील हॅम्बर्ग, जर्मनी मधील बाजारपेठेत अंजिराची विक्री होत आहे.
१५ दिवस टिकवणं क्षमता :-
पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष रोहन उरसळ म्हणाले की पुरंदमधील शेतकरी एकत्र येऊन अनेक वर्षे झाली निर्यातीचा प्रयत्न करत आहोत. जे की अंजिराची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी फोन वर्ष काम देखील केले आहे. विविध भागांतील खत, पाणी, कीटकनाशके तसेच काढणी यंत्रात बदल सुद्धा केला. अनेक विविध चाचण्या करून अंजीर 15 दिवस पूर्ण स्थित राहिल्याचे देखील समजले. या यशस्वी चाचण्या झाल्यामुळे पुरंदरचे अंजीर जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहचणार असल्याची माहिती समजलेली आहे.
जीआय मानांकन बागेतील अंजिराची निर्यात पुरंदर तालुक्यातील मयूर लवांडे आणि सौरभ लवांडे यांच्या बागेतील अंजीर खरेदी करण्यात आले आहेत. अंजिराच्या पॅकिंग साठी केतन वाघ यांनी इस्त्राईल मधून पॅकिंग मटेरिअल सुद्धा मागवले आहे. तसेच क्रॉप सायन्स चे चेतन भोट यांनी युरोप मधील निर्यात प्रोटोकोल पाळून यशस्वीरीत्या निर्यात केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रामचंद्र खेडेकर, गणेश कोलते, सागर लवांडे, दीपक जगताप,समिल इंगळे, अतुल कडलग यांच्यासह इतर संचालकांनी विशेष प्रयत्न केले.
पुरंदर मध्ये सर्वात जास्त अंजिराची लागवड :-
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू तसेच कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात अंजीर फळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात ४०० हेक्टर उत्पादन घेतले जाते. जे की महाराष्ट्र राज्यात पुरंदर तालुक्यात सर्वात जास्त अंजीर फळाचे शेतकरी उत्पादन घेत असतात.
Published on: 15 April 2022, 06:23 IST