Horticulture

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये ५५२ गाडी आवक झाली असून हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. आता मसाल्यांपाठोपाठ हिरवी मिरची कडाडली असून ज्वाला मिरची ६० ते ८० तर लवंगी मिरची ४० ते ६५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. उत्पादन कमी आणि महागाई अधिक असल्याने संबंधित दर वाढ झाल्याचे मुंबई

Updated on 11 February, 2022 4:39 PM IST

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये ५५२ गाडी आवक झाली असून हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. आता मसाल्यांपाठोपाठ हिरवी मिरची कडाडली असून ज्वाला मिरची ६० ते ८० तर लवंगी मिरची ४० ते ६५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. 

उत्पादन कमी आणि महागाई अधिक असल्याने संबंधित दर वाढ झाल्याचे मुंबई बाजार समितीमधील व्यापारी सांगत आहेत. अवकाळी पावसाने मिरचीचे कमी उत्पादन झाले असून सध्या पडत असलेल्या धुक्यामुळे अनेक रोगांनी मिरची पिकाला घेरले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून पुढेही मिरचीचा तुटवडा भासणार असे दिसत आहे.

सध्या महागाईने डोके वर काढल्याचे दिसून येत असून तेल आणि मसाल्यापाठोपाठ दैनंदिन जेवणात वापरली जाणारी मिरची तडकल्याने सामान्यांचे हाल होणार आहेत. शिवाय घाऊक बाजारात ४० रुपये किलो असलेली मिरची किरकोळ बाजारात मात्र १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी दिसत आहे. मिरची, आले आणि लिंबडा हा प्रतिदिन जेवणात वापरला जाणारा मसालाच महागल्याने सामन्यांचे बजेट बिघडले आहे.

मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये दररोज सरासरी दोनशे क्विंटल हिरव्या मिरचीची गरज भासते. यातूनच मिरचीची निर्यात हि केली जाते हि गरज पूर्ण करण्यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि बुलढाणा, नाशिक मधून हिरव्या मिरच्या बाजारात येतात. पावसा व्यतिरिक्त हंगामात पालघर मधूनही मिरच्या बाजारात येत असतात. त्यामुळे मुंबई बाजाराची मिरचीची गरज पूर्ण होते .
मात्र सध्या मिरचीची आवक कमी झाली आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

मात्र आता बाजारात माल कमी येत असल्याने आवक कमी आणि मागणी वाढली आहे. मिरचीची निर्यात देखील जोमाने सुरु असल्याने आणखी दिवस मिरचीच्या दरात वाढ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

English Summary: Chili Kaddali in Mumbai Agricultural Produce Market Committee; An increase of Rs
Published on: 11 February 2022, 04:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)