डाळींबाचे क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांपासून लक्षणीयरित्या गट होत आहे.मर आणि तेल्या रोगाने अक्षरशा थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशा डाळिंबाच्य बागांवर अक्षरशा कुऱ्हाडी चालवल्या
महाराष्ट्रामध्ये सोलापूर, नासिक आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे लागवड झालेली होती परंतु आता बऱ्याच बागा या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचे उत्पादन घेतले जात होते.परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने थेट डाळिंबाच्या बांधावर जाऊन डाळिंब बागेची पाहणी केली. डाळिंबाच्या भागांवर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहेच पण बदलत्या वातावरणामुळेशेतकऱ्यांना बागांचे व्यवस्थापन करता आले नाही.आणि याच कारणामुळेअधिक प्रमाणात नुकसान झाले असल्याचे नवी दिल्ली येथील तज्ञांच्या केंद्रे पथकाच्या निदर्शनास आले आहे. जर तेल्या रोगाचा विचार केला तर या रोगावरअद्याप पावे पर्यंत तरी प्रभावी औषध नाही.तर दुसरीकडे खोड कीडडाळिंबाच्या बागांमध्ये कायमच सक्रिय असते.
त्यासोबतच यावर्षी अधिकचा पाऊस झाल्याने या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात फोफावला आहे. शिवाय सातत्याने वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापनातही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. कीड व रोगांचे नियंत्रण व व्यवस्थापन वेळेत न झाल्यामुळे खोडकिडीचे वाढ होण्यास पोषक वातावरण तयार झाले व त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे चंद्र पथकातील सहसंचालक डॉ.किरण दशेकर यांनी सांगितले.
याबाबतीत केंद्रीय पथकाचा सल्ला
डाळिंब बागांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असेल तर शेतकऱ्यांनी प्रति लिटर पाण्यात इमामेक्टीन बेंजोएट दोन ग्रॅम, प्रोपिकॉनाझोल दोन मिली एकत्र मिसळून फवारणी करावी लागणार आहे.
डाळिंब बागे चा बहार धरणे अगोदर जमिनीपासून दोन फुटांपर्यंत खोडा सह फांदीवर दहा लिटर पाण्यामध्ये लाल माती चार किलो, इमामेक्टीन बेंजोएट 20 मिली,कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम एकत्रित करून खोडाला लेप द्यावा लागणार आहे. तसेच दहा टक्के बोर्डो मिश्रणाचा लेप आलटून-पालटून वापरण्याचा सल्ला कीटकशास्त्रज्ञ डॉ.राघवेंद्र देवरमनी यांनी दिला आहे
Published on: 24 February 2022, 01:17 IST