Horticulture

आपण बाजारामध्ये सफरचंदाचे फळ पाहतो केव्हाही ते चकाकदार दिसते. कारण सफरचंदाच्या फळावर कोटिंग करून आणि सफरचंदाला कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून त्याचा तजेलदारपणा टिकवून ठेवला जातो.

Updated on 05 April, 2022 7:51 AM IST

आपण बाजारामध्ये सफरचंदाचे फळ पाहतो केव्हाही ते चकाकदार दिसते. कारण सफरचंदाच्या फळावर कोटिंग करून आणि  सफरचंदाला कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून त्याचा तजेलदारपणा टिकवून ठेवला जातो.

यासंदर्भात काही संशोधन करण्याच्या हेतूने दिल्ली विद्यापीठ  आणि कॅनडा येथील मेक मास्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी उत्तर भारतातून काही सफरचंदाच्या फळाचे नमुने घेतले. जे सफरचंदाचे फळ विक्री पूर्वी साठवून ठेवले होते. जेव्हा यावर संशोधन केले गेले तेव्हा आश्चर्यचकित करणारी एक  गंभीर बाब समोर आली. संशोधकांच्या मते, बाजारात जे सफरचंदाचे फळ विकले जातात त्यापैकी 13 टक्के सफरचंदावर कॅण्डिडा ओरीस नावाची बुरशी आढळून आली. कारण सफरचंद ताजे रहावे यासाठी बुरशीनाशकाचा वापर होतो व याच माध्यमातून अशा घातक कीड वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होते. ज्यावर कुठल्याही प्रकारच्या औषधाचा परिणाम होत नाही. या किडीच्या संपर्कात आल्यावर व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

नक्की वाचा:Tata Electric Car: टाटाची ही गाडी चार्जिंगचे सगळे रेकॉर्ड मोडणार; जाणून घ्या कारचे फिचर आणि किंमत

 काय म्हणते संशोधन?

 सफरचंद तजेलदार ठेवण्यासाठी जे बुरशीनाशक वापरले जातात त्यांच्या माध्यमातून नकळत कॅंडीडा ओरीस नावाच्या बुरशीच्या प्रसारासाठी हे बुरशीनाशक सहाय्यभूत ठरत आहेत. जर्नल एम्बायो मध्ये प्रकाशित संशोधनासाठी उत्तर भारतातील 62 सफरचंदाच्या वरच्या भागाची तपासणी केली. या तपासणीसाठी निवडण्यात आलेल्या 62 सफरचंद यांपैकी 42 सफरचंद बाजारात विकले जाणार होते. व यातील वीस सफरचंद थेट बागेतून घेतली गेली. या संशोधनातून असा निष्कर्ष निघाला की, यापैकी आठ सफरचंदावर कॅंडिडा ओरिस कीड दिसून आली.

नक्की वाचा:सोयाबीन खरेदी करताना खासगी व्यापाऱ्यांकडून मापात पाप, धक्कादायक माहिती आली समोर..

यापैकी 5 रेड डिलिशिअस आणि तीन रॉयल गाला होते. जे सफरचंद थेट बागेतून घेतली गेली होती त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कीड आढळली नाही. यावर संशोधकांनी असे मत मांडले की सफरचंदाचे फळ तजेलदार दिसावे व चांगले टिकावी त्यासाठी ज्या बुरशीनाशकांचा थर चढवला जातो. 

जेणेकरून या माध्यमातून यीस्ट संपुष्टात यावे. मात्र हे बुरशीनाशक कॅडिडा ओरिस वर कुठलाही परिणाम करत नाही. त्यामुळे जर तुम्ही बाजारातून सफरचंद घ्याल तर ती चांगली धुऊन खावीत. गरम पाण्यामध्ये बुडवून साफ करावेत व स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावीत. जेणेकरून त्यावरचा थर स्वच्छ होईल.(स्त्रोत-दिव्य मराठी)

English Summary: candid oris fungas find out in apple layer so take precaution before aplle eating
Published on: 05 April 2022, 07:51 IST