Horticulture

भारतात स्ट्रॉबेरीची लागवड बर्या च वर्षांपासून केली जात आहे.परंतु आताया लागवडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे.स्ट्रॉबेरी च्या माध्यमातून जास्तीचे उत्पन्न मिळत असल्याने याकडे शेतकरी आतावळत आहेत.आता शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड पॉलिहाऊसमध्ये तसेच हायड्रोपोनिक्सत तंत्रानेचांगल्या पद्धतीने करीत आहेत

Updated on 21 December, 2021 2:11 PM IST

भारतात स्ट्रॉबेरीची लागवड बर्‍याच वर्षांपासून केली जात आहे.परंतु आताया लागवडीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे.स्ट्रॉबेरी च्या माध्यमातून जास्तीचे उत्पन्न मिळत असल्याने याकडे शेतकरी आतावळत  आहेत.आता शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड पॉलिहाऊसमध्ये तसेच हायड्रोपोनिक्‍स तंत्रानेचांगल्या पद्धतीने करीत आहेत

सर स्ट्रॉबेरीची लागवड खुल्या शेतात करायचे असेल तर काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते.जर शेतकऱ्यांनी खुले शेतामध्ये स्ट्रॉबेरीचे योग्य व्यवस्थापन केले तरभरपूर उत्पन्न या माध्यमातून मिळू शकते. या लेखामध्ये आपण स्ट्रॉबेरी लागवड विषयी थोडक्यात जाणून घेऊ.

 स्ट्रॉबेरी लागवड

  • स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य काळ-भारतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड सहसासप्टेंबर मध्ये केली जाते. पावसाळ्यानंतर चा हा काळ स्ट्रॉबेरी साठी योग्य मानला जातो. स्ट्रॉबेरीची रोपे कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये लावता येतात.मात्र लाल माती असल्यास त्याचे उत्पादन अधिक मिळते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी 15 ते 30 अंश तापमान योग्य असते.उच्च तापमानामुळे पिकावर वाईट परिणाम होतो.
  • स्ट्रॉबेरीच्या प्रमुख जाती- संपूर्ण जगात स्ट्रॉबेरी चे सहाशे प्रकार आहेत.भारतातील शेतकरी काम रोसा,चांदलर, ब्लॅक मोर,स्वीडचार्ली,  एलिस्टाआणि फेअर फॉक्स या वाणाचा वापर करतात. या जाती भारताच्या हवामानानुसार योग्य आहेत.
  • स्ट्रॉबेरी ची पूर्वमशागत- स्ट्रॉबेरी लागवडीपूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतामध्ये तीन ते चार वेळा रोटर मारला जातो.त्यानंतर त्यामध्ये शेणखत मिसळावे. शेतकरी रासायनिक खतांचा देखील वापर करू शकतात.यानंतर शेतात बेड बनवले जातात.बेडची रुंदी एक ते दोन फूट दरम्यान  ठेवावे लागते. दोन बेडमध्ये सारखे अंतर ठेवणे आवश्यक असते. रोपांची लागवड करण्यासाठी प्लास्टिक पेपर द्वारे मल्चिंग केले जाते आणि त्या मध्ये निश्चित अंतरावर छिद्रबनवले जातात.
  • लागवडीनंतर करायचे काम- स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा लक्षात ठेवून वेळोवेळी शेताला पाणी देणे गरजेचे असते.स्ट्रॉबेरी मधून चांगले उत्पादन मिळण्यासाठीखताचे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. शेतातील जमिनीचा पोत आणि स्ट्रॉबेरीच्या प्रकारावर अवलंबून खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी मित्रांचा आणि कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. स्ट्रॉबेरी लागवडीच्या दीड महिन्यानंतर फळे येण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया पुढे चार महिने चालू राहते. जर फळाचा रंग अर्ध्यापेक्षा लाल झाला तर ते फळ तोडणी ला योग्य आहे असे समजावे.
English Summary: can earn more money and profit through strwaberry cultivation
Published on: 21 December 2021, 02:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)