महाराष्ट्र मध्ये मागील दहा ते बारा वर्षात अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे ऊस पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आला.जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये या अळीच्या च्या 300 प्रजातींची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र मध्ये प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यांना नदीकाठावरील आणि माळावरील असे संबोधले जाते.तसेच मागील तीन ते चार वर्षांमध्ये नवीन दोन प्रकारच्या प्रजाती आढळले आहेत..होलोट्रॅकिया सेरेटाया हुमणीच्या जातीपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.ही प्रजाती हलक्या जमिनीत ओळख कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते. या प्रजातीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीवर 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. तसेच उत्पादनात 15 ते 20 टनापर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे हुमनी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.हुमणी किडीच्या बंदोबस्तासाठी नैसर्गिक उपाय म्हणून रुईच्या पानांचा रस प्रभावी ठरतो का? याचे उत्तर आपण आजच्या लेखात माहीत करून घेणार आहोत.
हुमणी व्यवस्थापन
जैविक
- मेटारायझियम आणि बिव्हेरिया हे जिवाणू वापरावेत.
नैसर्गिक:
- रुईचा पाला चार ते पाच किलो घेऊन तो वीस लिटर पाण्यात उकळून घ्यावा व थंड झाल्यावर 200 लिटर पाण्यात टाकून त्याची आळवणी करावी.
पारंपारिक:
- पीक काढणी नंतर लगेच 15 ते 20 सेंटिमीटर खोल बलराम तो लाकडी नांगराने नांगरट करून घ्यावी किंवा रोटर मारावे.
- पावसाच्या पहिल्या सरी बरोबर भुंगे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. हे संध्याकाळी साडे सहा ते नऊ वाजेपर्यंत कडूलिंबाच्या झाडावरती असतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. अशावेळेस कडुलिंबाचे झाड हलवावे.हलवल्या बरोबर झाडावरील पतंग खाली पडतील त्यानंतर ते पडलेले पतंग गोळा करा अर्धा तास रॉकेल मध्ये ठेवावे. अशामुळे पुढचेनुकसान टळेल.
रासायनिक:
- क्लोरो दोन लिटर+सायपरमेथ्रीन 0.5 लिटर ड्रेचींग किंवा पाट पाण्यातून सोडावे. काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
- बायरचे लेसेंटा चांगले काम करू शकते. ऊस लागणीनंतर लगेच ड्रेचींग केल्यास चांगला परिणाम मिळतो आणि उसाची वाढ देखील उत्तम होते.
- लेसेंटा 200 ग्रॅम व डेसिस 100 ते 250 मिली 400 लिटर पाण्यातून आळवणी करावी.
(संदर्भ- हेल्लो कृषी करिता लेखक शरद केशवराव बोंडे(जैविक
शेतकरी )
Published on: 12 December 2021, 07:30 IST