Horticulture

केळी हे पीक महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये घेतले जाते. खानदेश म्हणजे जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हणून संबोधण्यात येते. केळी हे शेतकऱ्यांसाठी नगदी असलेले फळपीक आहे. परंतु प्रत्येक फळबागांवर जसा किडींचा प्रादुर्भाव होतो तसाच केळीवर देखील अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या लेखात आपण केळी पिकावरील बंची टॉप विषाणू विषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 13 November, 2021 2:30 PM IST

 केळी हे पीक महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये घेतले जाते. खानदेश म्हणजे जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हणून संबोधण्यात येते. केळी हे शेतकऱ्यांसाठी नगदी असलेले फळपीक आहे. परंतु प्रत्येक फळबागांवर जसा किडींचा प्रादुर्भाव होतो तसाच केळीवर देखील अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या लेखात आपण केळी पिकावरील बंची टॉप विषाणू विषयी माहिती घेणार आहोत.

 केळी बागा वरील बंची टॉप विषाणू

 केळीवरील बंची टॉप व्हायरस हा खूप धोकादायक आहे.या विषाणूचा परिणाम हा संपूर्ण केळीच्या झाडा वर होतो.यामध्ये केळीचे झाड पूर्ण नष्ट होत नसली तरी योग्य प्रकारे वाढ होत नाही. त्यामुळे केळीच्या दर्जा खालाऊन भावही मिळत नाही. भारतातील केळीच्या भागांपैकी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे क्लस्टर टॉप डिसीज म्हणजेच पर्णगुच्छ हाहोय. या व्हायरसने 1950 मध्ये केरळ च्या चार हजार चौरस किमी क्षेत्रातील बागेला संक्रमित केले होते.

 एका आकडेवारीनुसार केरळमधील या आजारामुळे दरवर्षी सहा कोटी रुपयांचे नुकसान होते. केरळ सोबतच इतर राज्यांमध्ये देखील जसे की, आंध्र प्रदेश,ओरिसा, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये देखील हा आजार दिसून आला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव झालेले वनस्पती शंभर टक्के नुकसान ग्रस्त होतात.केळी बागायतदार या बंची टॉप म्हणजेच पर्णगुच्छ रोग विषाणूमुळे सर्वात जास्त चिंताग्रस्त आहेत.

बंची टॉप म्हणजेच पर्णगुच्छ रोगाची लक्षणे

 या आजाराचे लक्षणे वनस्पतीच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर दिसतात. यामध्ये झाडाच्या वर पानांचा गुच्छ बनतो म्हणून या आजाराला पर्णगुच्छ म्हणजेच क्लस्टर टॉप असे म्हणतात. जवा या रोगाचा प्रादुर्भाव केळी पिकावर होतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि उंची 60 सेंटिमीटर पेक्षा जास्त वाढत नाही एवढेच नाही तर या वनस्पतींना फळांची लागण होत नाही.

 बंची टॉप रोगावर करायचे उपाय योजना

 निरोगी आणि लागण झालेल्या वनस्पतींवर कीटकनाशके कीटक नियंत्रण इमिडाक्लोप्रिड औषधाची फवारणी ही दोन लिटर पाण्यात मिसळून करावी. त्यामुळे रोगजनक कीटक नष्ट होतात आणि रोगांचा प्रसार रोखला जातो.

विषाणूच्या निदानासाठी कीटकनाशकांचा वापर त्याच दिवशी जवळच्या सर्व बागांना एकत्रितपणे केला पाहिजे. जेणेकरून या विषाणूचे वाहक कीटक जवळच्या बागामध्ये जाणार नाहीत आणि त्यांचा प्रादुर्भाव पाडणार नाही. केळी  बागाची  लागवड करताना रोग सहनशील जाती निवडला पाहिजे. केळीचे शेत तणमुक्त ठेवावे. भोपळा यासारखी आंतरपीक केळी मध्ये घेऊ नये. विषाणूग्रस्त वनस्पती मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी खतांचे 25 ते 50 टक्के अधिक शिफारस केलेले डोस आणि दहा किलो सडलेले शेणखत केळीच्या बुडाशी घालावे. त्यामुळे रोग नियंत्रणात येतो व उत्पादकता देखील वाढते.

( स्त्रोत- टीव्ही नाईन मराठी )

English Summary: bunchi top virous in banana crop and his management
Published on: 13 November 2021, 02:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)