जर बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर हे मुख्यत्वेकरून भारतीय वेदांवर आधारीत जैवऊर्जा म्हणजेच बायोडायनॅमिक तंत्र होय.
या तंत्रात ब्रम्हांडातील ग्रह तारे यांचा पृथ्वी वनस्पती आणि जलचरावर होणारा सकारात्मक परिणामांचा अभ्यास आणि विचार केला जातो. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टींचा कुठल्याही पद्धतीचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट या तंत्रज्ञानात तयार करता येते. या तंत्रज्ञानात प्रत्येकी अन्नघटकांचा जसं की नत्र, स्फुरद,पालाश इत्यादींचा वेगवेगळा विचार करण्याऐवजी सगळे अन्नद्रव्यांचा एकत्रित विचार केला जातो. शेणखत हे शेतीसाठी फार उपयुक्त आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये जनावरांची संख्या आणि त्यांपासून शेणखताची उपलब्धता फार कमी झाली आहे. आणि जे काही उपलब्ध आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे म्हणजेच त्यामध्ये गवऱ्या, तणाच्या बिया किंवा प्लास्टिक मिसळूनते एवढे उपयुक्त राहत नाही. परंतु बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने मूग उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्याच्या उपलब्ध काडाचे उपयोग कंपोस्ट तयार करण्यासाठी केला पाहिजे. अशा प्रकारचे कंपोस्ट हे बायोडायनॅमिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने करणे शक्य होते.
नक्की वाचा:शेतीसाठी 24 तास वीज असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी'
1) बायोडायनॅमिक कंपोस्टसाठी करावी लागणारी पूर्वतयारी :
1) या पद्धतीमध्ये पीक अवशेषांचे थरावर थर रचले जातात. त्यापासून साधारणत: दोन अडीच महिन्यात कंपोस्ट तयार होते. जर या पद्धतीमध्ये थोडी पूर्वतयारी केल्यास वेळेची चांगल्याप्रकारे बचत होते.
2) ज्या पिकांचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी थर द्यायचे आहेत अशा पिकांचे अवशेष चार-पाच दिवस पुरेसे ओले करावेत. जेणेकरून ते नरम होऊनजिवाणूंना काम करणे सोपे होते. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनची काड, मुग, उडदाच्या शेंगांची टरफले त्वरित कंपोस्टसाठी वापरता येतात.ते चांगल्या प्रकारे व पूर्णपणे कुजतात.
3) त्याअगोदर एक बैलगाडी ओले शेन जमा करून ठेवावे.
4) कोणत्याही वनस्पती चा हिरवा पाला दोन बैल गाडा इतका जमा करून ठेवावा.
5) यामधील एक ढिगासाठी एक किलो बायोडायनॅमिक एस 9 हे विरजण स्वरूपात लागते.
10) यामध्ये कंपोस्ट तयार करण्यासाठी खड्डा खोदण्याची गरज नसते. शेतावरील उंचावरील सपाट जागा निवडून, पूर्व पश्चिम दिशेने पंधरा फूट लांब आणि पाच फूट रुंद अशी जागा आखून घ्यावी. त्या जागेवर पाणी शिंपडून चांगले ओले करावे. अगोदर शेणकाला तयार करून ठेवा एक किलो बायो डायनॅमिक एस 9 ही तेरा लिटर पाण्यात एक तासभर उलट सुलट पद्धतीने घोळून तयार करून ठेवावे. जशी आपली गरज असेल त्यानुसार ते जातीच्या पाण्यात टाकुन वाढविता येते.
नक्की वाचा:सकाळच्या या वाईट सवयी देऊ शकतात अनेक रोगांना निमंत्रण, जाणून घ्या ते कसे?
2) थर कसे असावेत :
पहिला थर अगोदर पुरेसे ओले केलेल्या पीक अवशेषांचा एक फूट उंचीचा असावा. त्यावर एस 9 द्रावण शिंपडून त्यावर पुरेसा शेन काला टाकावा. त्यानंतर या झाडावर हिरव्या झाडाचा पाला एक फूट उंचीपर्यंत पसरवून त्यावर एस 9 द्रावण शिंपडावे. शेनकाला टाकून शेतातील दोन घमेली माती पसरावी.अशा पद्धतीने पहिला थर तयार होतो. अशा पद्धतीने पाच फूट उंचीपर्यंत एकावर एक थर रचावेत. नंतर शेनकाला व माती मिसळून आणि उपलब्ध असल्यास गव्हांडा टाकून तयार केलेले मिश्रण हे ढीग पूर्णपणे जमिनीपर्यंत लिंपून घ्यावा.
3) उकरी करणे:
एक महिन्यानंतर या ढिगाचा आकार लहान होतो. त्या वेळी पूर्ण ढीग फावड्याने उकरून सर मिसळ करून घ्यावे. त्यावर पुरेसे पाणी टाकून ओले करून पुन्हा शेनकाल्याने लिंपून टाकावे. यावेळी एस 9 टाकण्याची गरज नाही. अशा पद्धतीने एकूण साठ-सत्तर दिवसात दर्जेदार कंपोस्ट खत तयार होते. यामध्ये सर्व पीक अवशेषांचे कंपोस्ट तयार झालेले असते. जे पदार्थ नुसते शेणखतामध्ये कुजण्यासाठी आठ ते नऊ महिने लागतात.
4) या तंत्रज्ञानाने तयार झालेले कंपोस्ट खताचे फायदे :
1) पंधरा फूट लांब व पाच फूट रुंद आकाराच्या ढिगातून साधारणात: दहा गंठण पूर्णपणे कुजलेले कुजलेले कंपोस्ट खत मिळते. मूग, उडीद शेंगांची टरफले सूर्यफुलाची काड इत्यादींची जाळून विल्हेवाट लावली जाते. त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट केल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
2) बायोडायनॅमिक कंपोस्ट ढिगातून साधारणत: पिकांसाठी 18 ते 20 किलो नत्र, उपलब्ध स्फुरद 18 ते 20 किलो, पालाश दहा किलोपर्यंत मिळते. याबरोबरच गंध झिंक,कॅल्शियम, मॅग्नेशियम, अनिल लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मिळतात.
3) बायोडायनॅमिक हे कंपोस्ट पिकाच्या आवश्यकतेनुसार नायट्रोजन कंपोस्ट फास्फोरस, कंपोस्ट पोटॅश, कंपोस्ट आणि सल्फर कंपोस्ट असे म्हणतात.
4) या तंत्रज्ञाने कंपोस्ट तयार करण्यासाठी खड्डा खोदण्याची गरज नसल्याने सावली करतात. शेड उभारण्याचा खर्च येत नाही किंवा दररोज पाणी देणे व देखभालीची गरज सुद्धा येत नाही.
5) पूर्वतयारी केली असल्यास दोन मजूर एका दिवसात दोन ढीग बनवू शकतात.
6) पूर्णपणे तयार झालेल्या कंपोस्ट ढिगाखाली बऱ्याच वेळा शेतातील गांडूळ जमा झालेली दिसून येतात. जमिनीमधील जीवाणू व गांडुळांना संक्रिय करण्यास बायोडायनॅमिक कंपोस्ट मोलाचे कार्य करते.
7) एका ढिगातून साधारणत: दहा क्विंटल म्हणजेच 50 किलो वजनाची सुमारे 20 पोती सेंद्रिय खत घरीच तयार होऊ शकते.
Published on: 25 March 2022, 06:30 IST