Horticulture

महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून,

Updated on 11 March, 2022 2:03 PM IST

महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजने अंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्‍टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे. ते शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत महाराष्ट्रात ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, जॉबकार्ड नसल्यामुळे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे.

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती :

१) या योजनेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावरून वर्तमानपत्रांमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तसेच अन्य माध्यमातून पुरेशी प्रसिद्धी देऊन इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतात ही अर्ज प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे.

२) इच्छुक शेतकऱ्यांनी जाहिरात दिल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा लागत होता. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी शेतकरी पोर्टल मार्फत स्वीकारले जातात.

३) या अर्ज स्वीकारल्यानंतर या योजनेअंतर्गत तालुकानिहाय सोडत काढून प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या सोडतीची माहिती महाडीबीटी पोर्टल वर नोटिफिकेशन द्वारे दर्शविण्यात येते.

४) कागदपत्रेप्राप्त झाल्यास लाभार्थ्याला पूर्वसंमती प्रदान करण्यात येते. तसेच लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून किंवा नारळ रोपे उचल करण्यास परवाना देण्यात येतो.

५) लाभार्थ्याला पूर्वसंमती प्राप्त झाल्यावर ७५ दिवसांमध्ये फळबागेची लागवड करणे आवश्‍यक असते. असे केले नाही, तर त्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येते आणि प्रतीक्षा यादीत असणाऱ्या अर्जदारांची त्याच्या ठिकाणी निवड केली जाते.

 

फळबाग लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा किती?

१) या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी कोकण विभागासाठी कमीतकमी ०.१० हेक्‍टर ते जास्तीत जास्त १० हेक्‍टर तर उर्वरित विभागांसाठी ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर मर्यादापर्यंत अनुदान अनुज्ञेय राहील.

२)लाभार्थ्याच्या ७/१२ नोंदीनुसार त्याला संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरिताच त्याला लाभ घेता येईल.

फळबाग लागवडीसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष

1)फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे शेत जमिनीचा ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. जर संयुक्त खाते असेल, तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्क राहील.

२) जर लाभार्थ्याची शेतजमीन कुळ कायद्याखाली येत असेल, ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळ कायद्याचे नाव असेल, तर ही योजना राबवण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असेल.

३) निवड करताना प्राप्त अर्जांमधून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग यांना प्राधान्य देण्यात येईल.

अ) शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे

१ जमीन तयार करणे.

२) सेंद्रिय खत मिश्रण आणि खड्डे भरणे.

३) रासायनिक खत वापरून खड्डे भरणे. अंतरमशागत करणे.

४)काटेरी झाडांचे कुंपण करायचे असल्यास ते करणे (ऐच्छिक)

 

ब) शासन अनुदानित कामे

१) खड्डे खोदणे.

२) कलमे लागवड करणे.

३) पिक संरक्षण नांग्या भरने.

४) ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे १०० टक्के राज्य शासन अनुदानावर केली जातील.

English Summary: BhauSaheb fundkar falbag scheme 2022 know about
Published on: 11 March 2022, 02:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)