वटवृक्ष या सुपरिचित प्रचंड वृक्षाचा आवृतबीज वनस्पतींच्या द्विदल वर्गात होतो. हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, व्दिपकल्पाचा पश्चिम भाग व दक्षिणेकडील टेकड्यांचा भाग या ठिकाणी हा जंगलात आढळतो. रस्त्यांच्या दुतर्फा, शेताच्या कडेला, बागांत, मंदिराच्या परिसरांत, समाधिस्थानांलगत सावलीसाठी हा वृक्ष लावतात. पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे याचा बीजप्रसार होऊन खेड्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा, पडक्या इमारती, भिंतीमधील भेगा इ. अनेक ठिकाणी तो वाढताना दिसतो. कडक ऊन, थंडी व पाऊस यांचा त्यावर प्रतिकुल परिणाम होत नाही.
वटवृक्ष अंतर्भाव
वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतो वृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात. तसेच फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ असे असतात. मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात.
अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात.
ह्याला हिंदीत बरगद असेही म्हणतात. ह्या वृक्षाची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे.
आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा 'न्यग्रोध' नावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इ. अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे. प्लिनी यांनी ‘इंडियन किग ट्री’ असा याचा उल्लेख केला आहे. हिंदूधर्माय वडाला पवित्र मानतात. सुवासिनी ज्येष्ठ पौर्णिमेस याची पूजा करतात. वटपौर्णिमा आली की सुवासिनी बायकांची सकाळीच वडाची पूजा करण्याची तयारी सुरू होते.
सजून सवरून तयार होतात आणी वडाची पूजा करून त्याच्या बुंध्याला दोऱ्याने गुंडाळत प्रदक्षिणा घालतात आणि मला अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करतात. सतीसावित्रीने याच वृक्षाखाली आपल्या पतीचे प्राण यमराजा कडून परत आणले. त्याला जिवंत केले. आपल्या सौभाग्याचे रक्षण याच वृक्षाच्या साक्षीने केले, ही अख्यायिका पुराणात आढळते. म्हणूनच सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेला वडाचे पूजन करतात.
भारतीय संस्कृती, शास्त्र, परंपरा, रुढी यांत वृक्षांना अनन्यसारधारण महत्त्व आहे. सीता देवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधीवृक्षांपैकी हा एक आहे.
वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौ पावित्र्याचे प्रतीक मानतात.
वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष. त्याचा भव्य विस्तार, डौलदारपणा, दाट पानांमुळे मिळणारी दाट सावली यामुळे पूर्वीच्या काळी हा वृक्ष वाटसरूचे आश्रयस्थान असे. म्हणूनच याला आधारवडही संबोधल्या जाते. याच्या लोंबणाऱ्या पारंब्या वरून खाली येतात. आणि या पारंब्या पुन्हा जमिनीत मुळं धरतात आणि या प्रकारे या वृक्षाचा विस्तार कायम वाढत असतो.
पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे याचा बीजप्रसार होऊन खेड्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा, पडक्या इमारती, भिंतीमधील भेगा इ. अनेक ठिकाणी तो वाढताना दिसतो. कडक ऊन, थंडी व पाऊस यांचा त्यावर प्रतिकुल परिणाम होत नाही.
Published on: 11 March 2022, 02:09 IST