Horticulture

सगळ्यात आगोदर केळी म्हटले तर आपल्यासमोर उभा राहतो जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्याला केळीचा आगार म्हटले तरी वावगे ठरणार नाही. केळी पिकासाठी लागणाऱ्या जमिनीचा आणि पाण्याचा जर विचार केला तर केळीला काळी कसदार जमीन आणि पाण्याचा भरपूर पुरवठा आवश्यक असतो.

Updated on 25 November, 2020 12:15 PM IST

सगळ्यात आगोदर केळी म्हटले तर आपल्यासमोर उभा राहतो जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्याला केळीचा आगार म्हटले तरी वावगे ठरणार नाही. केळी पिकासाठी लागणाऱ्या जमिनीचा आणि पाण्याचा जर विचार केला तर केळीला काळी कसदार जमीन आणि पाण्याचा भरपूर पुरवठा आवश्यक असतो. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देत मालेगाव तालुक्यातील माळ माथा सारख्या पाण्याचे तुटवडा आणि सुपीक जमिनीची कमतरता असलेल्या परिसरात माळमाथा परिसरातील मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील शेतकऱ्यांनी वीस ते पंचवीस एकरावर केळीची पीक घेतले. तसे पाहायला गेले तर कसमादे पट्ट्यात असा विचार केला तर डोळ्यासमोर येतो तो मका आणि कांदा आणि फळ पिकांमध्ये डाळिंब. परंतु हा भाग डाळिंबाचाआगार म्हणून काही वर्षांपूर्वी ओळखला जायचा. परंतु मर व तेल यासारख्या डाळिंब वरच्या रोगांमुळे डाळिंब बागा उपटून टाकल्याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता.

त्यामुळे या परिसरातील बरेच शेतकरी अन्य पिकांकडे वळले. तालुक्यातील टिंगरी येथील राजेंद्र जाधव व इतर काही शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी अल्प प्रमाणात केळीचे पीक घेतले व ते यशस्वी झाल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये केळीची लागवड केली. यासाठी प्रत्येक की एका रोपाच्या नगा साठी 15 रुपये खर्च आला. केळीचे पीक लागवडीनंतर साधारण दहा-बारा महिन्यानंतर येते. मागच्या काही वर्षांमध्ये कसमादे पट्ट्यामध्ये सरासरीच्या दीडशे ते दोनशे टक्के पाऊस झाल्यामुळे पाण्याचा पुरवठा तसा भरपूर आहे. त्यामुळे केळी साठी लागणारी पाण्याची गरज उत्तम प्रकारे भागवली जाते. शिवाय पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विहिरी, शेततळे, ठिबक सिंचन इत्यादी सुविधांचा वापर करून पाण्याची व्यवस्था केली. केळी पिकाला इतर फळपिकांच्या तुलनेत कमी खर्च लागतो.

 त्यामुळे हे पीक आर्थिकदृष्ट्या परवडणारे पीक असून हळू क्षेत्र वाढविण्याचा विचार आहे असे राजेंद्र जाधव यांनी सांगितले. सदर केळी लागवडीची पाहणी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी केली.   यावरून असे दिसते की, कष्टाला जर अफाट जिद्द, काटेकोर नियोजन आणि तंत्रज्ञानाचा जोड दिली तर कोणत्याही परिस्थितीत उत्तम प्रकारे पीक घेऊन यशस्वी होता येते.

English Summary: banana garden grow in new land
Published on: 25 November 2020, 11:53 IST