जळगाव जिल्ह्यातील करंज या गावातील काही तरुण शेतकऱ्यांनी शेतीमधील व्यावसायिक दृष्टिकोन जोपासून व तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकाचे उच्चतम व निर्यातक्षम उत्पादन घेतले आहे. केळी या पिकाच्या मार्केटचा सगळा अभ्यास करूनवनिर्यातीसाठी लागणारे आवश्यक गोष्टींचे प्रशिक्षण घेऊन सदर गोष्टींचा आपल्या बागेत वापर केल्याने गावातील शेतकऱ्यांची केळीला निर्यातदार पसंती देत आहेत.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जळगाव तसेच कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांच्या सहकार्याने करंजा गावच्या तरुण शेतकऱ्यांनी केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेण्याकरता आवश्यक असलेले तंत्रज्ञान म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे बड इंजेक्शन तंत्रज्ञानाचा योग्य वेळी वापर, केळीच्या घडांचे व्यवस्थापन व फ्लोरेट योग्य वेळी काढणे यासंबंधीचे प्रशिक्षण आयोजित करून शेतीसाठी लागणाऱ्या उपयुक्त तंत्रज्ञान अवगत केले. इतकेच नाही तर परिसरातील शेतकरी व मजुरांना देखील प्रशिक्षित करून त्यांच्या मदतीनेकेळीचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यास यशस्वी झाले.
गेल्या आठवड्यात 16 सप्टेंबरला या गावातून जवळजवळ सत्तर टन केळी धरती कृषी संवर्धन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून निर्यात करण्यात आलेले आहे. केळी निर्यात केल्याने संबंधित शेतकऱ्यांना स्थानिक बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.आतापर्यंत करंजा येथील शेतकरी श्री प्रदीप शांताराम पाटील, श्री प्रदिप जगन्नाथ पाटील, श्री किशोर हिलाल पाटील यांच्या शेतीतील केळी इराण येथे निर्यात करण्यात आलेले आहे.
कृषी विभागातील आत्मा यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन कसे घ्यावे व त्यावरील कीड व्यवस्थापन यासंबंधी विषयाच्या आयोजित प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी व मजुरांना प्रशिक्षित करून त्याचा परिणाम योग्य व योग्य नियोजन करून केळी पिकाच्या निर्यातीकरीता इतर आवश्यक बाबींचा अवलंब केला असता बाजारभावानुसार कटाई केली असता रुपये अकराशे ते 1125 रुपये भाव मिळाला असता परंतु या निर्यातक्षम केळी तंत्रज्ञानाचा वापर केळी उत्पादनासाठी केल्याने सदरील उत्पादित केळीचे डाग मुक्त व उच्च दर्जाचे असल्याने निर्यातदारांनी रुपये 1325 या दरानेकेळी जागेवर खरेदी केली.(साभार-सकाळ )
Published on: 22 September 2021, 11:30 IST