शेतकरी वर्गावरील संकटाची मालिका कायमच आहे. एका संकटातून बाहेर पडतोच तोपर्यंत शेतकरी वर्गावर दुसरे संकट येत आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग सुद्धा भल्या मोठ्या चिंतेत आणि अडचणीत सापडला आहे.सुरवातीला पावसामुळे नुकसान नंतर ऐन खरीप हंगामात अवखाळी पावसामुळं झालेलं नुकसान नंतर ऐन रब्बी हंगामाच्या तोंडाला खतांचा तुटवडा या मुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे.
पाणी साचल्यामुळे बागेतील झाडांची पाने पिवळी :
खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे निम्म्याहून उत्पन्न घटले आहे रानात पाणी साचल्याने अनेक पिके पाण्याखाली जाऊन खराब झाली. सोबतच खरीप हंगामातील पावसामुळे फळबागांचे सुद्धा भले मोठे नुकसान झाले आहे.रानात पाणी साचल्यामुळे बागेतील झाडांची पाने पिवळी पडली आणि त्यामुळं झाडांची पाने गळू लागली. त्यासोबतच फळे सुदधा गळू लागली. पवनी, नांदगाव, खंडेश्वर या गावातील त्रस्त शेतकऱ्यांनी तर संत्रा बागच रानातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या संत्राच्या फळबागांना गलगळती लागल्यामुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी च्या होणाऱ्या या नुकसनामुळे शेतकरी राजा सुद्धा त्रस्त झालेला आहे. मशागती साठी घातलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने रानातून बागा काढून टाकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.तसेच या बाबत कोणत्याच कृषी विद्यापीठाकडून किंवा कृषी अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्रस्त शेतकरी वर्गाने बागा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
फळमाशिचा धोका:-
अंतिम टप्प्यात फळ आल्यावर फळाला फळमाशी चा धोका असतो. फळमाशी ही थेट झाडाच्या खोडात अंडी घालत असते. नंतर त्याच अंड्यातील अळ्या ह्या फळाचा गर खात असतात. फळमाशीने तयार केलेल्या छिद्रातून सुक्ष्म किटक हे फळामध्ये जातात त्यामुळं फळ खराब होयला आणि सडायला सुरवात होते. आणि फळे मोठ्या प्रमाणात गळू लागतात.
Published on: 13 November 2021, 05:15 IST