Horticulture

नवीन पिकांचे आणि फळांच्या वाणावर संशोधन करण्याचे काम देशातील विविध प्रकारचे कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्था सातत्याने करत असतात. त्यांच्या या अथक संशोधन कार्यातून शेतकऱ्यांना फायदेशीर अशा वानांची नवनिर्मिती होत असते. अशाच एका पेरूच्या वाण हे मंगळुरू येथील संशोधन संस्थेने विकसित केले असून या पेरूच्या वाणाचे नाव आहे 'अर्का किरण' हे होय. अनेक शेतकरी या पेरूच्या जातीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. या लेखामध्ये आपण अर्का किरण जातीच्या पेरूचे वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

Updated on 29 July, 2022 7:05 PM IST

नक्की वाचा:Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी

 'अर्का किरण' पेरूची वैशिष्ट्ये

1- व्यावसायिक दृष्ट्या पेरूचे उत्पादन घेण्यासाठी अर्का किरण ही पेरूची जात शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

2- या जातीच्या झाडाला जास्त प्रमाणात व लवकर पेरू लागतात व विक्रीसाठी लवकर तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर आर्थिक उत्पन्न हातात मिळते व बाजारपेठेत देखील चांगला भाव मिळतो.

नक्की वाचा:Cotton Management: 'हीच' परिस्थिती राहिली तर कपाशी पिकावर फुलकिडे आणि कोळी किडीचा वाढेल प्रादुर्भाव,वाचा कारणे आणि उपाय

3- या जातीच्या पेरूमध्ये लायकोपीन चे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. शरीरामध्ये इम्युनिटी अर्थात  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम हा पेरू करतो. अर्का किरण जातीचे पेरू थोडे कठीण असतात मात्र आतली बाजू थोड्याशा हलक्या लाल रंगाची असते.

4- संकरित जात कामसारी व पर्पल लोकल यांच्या संकरातून विकसित केली असून या फळांचा गर गुलाबी असतो. अर्का किरण जातीच्या पेरूचे सरासरी वजन 90 ते 120 ग्रॅम असते. तसेच या या फळाचा टी एस एस 13-14 अंश ब्रिक्‍स असतो.

 नक्की वाचा:Fertilizer Management: अशापद्धतीने वाढवा 'स्फुरदाची' कार्यक्षमता,मिळेल भरघोस उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न

English Summary: arca kiran is the variety of the guava orchard give more production
Published on: 29 July 2022, 07:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)