Horticulture

पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्न घटकांच्या संबंधित असलेल्या विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात व असलेली कमतरता भरून काढतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास जास्त फायदा होतो.

Updated on 12 February, 2022 5:23 PM IST

पिकांमध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्न घटकांच्या संबंधित असलेल्या विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात व असलेली कमतरता भरून काढतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास जास्त फायदा होतो.

कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. पिकाची वाढीची अवस्था पाहून विद्राव्य खतांचा वापर करणे फायद्याचे ठरते. विद्राव्य खते पिकांना देताना सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे आणि सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात. या लेखात आपण फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा उद्देश आणि द्रावण  तयार करताना घ्यायची काळजी याबद्दल माहिती घेऊ.

 फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा उद्देश

  • पिकांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
  • अतिवृष्टी झाल्यामुळे किंवा सतत पाऊस पडल्यामुळे जमिनीतील खते वाहून जातात.तसेच पाणी साचल्यामुळे मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणी मधुन खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात.
  • जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा परिस्थिती असल्यास फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पिकांची पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात तसेच पिके अवर्षण परिस्थितीत तग धरू शकतात.
  • बऱ्याचदा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पाने कुरतडली जातात व खाल्ली जातात. पानाची जाळी होती अशावेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात.
  • फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना नक्कीच पर्याय होऊ शकत नाहीत. परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढण्याचे काम हे खते करतात.
  • पीक फुलोऱ्यात असताना, मोहोर येण्याच्या वेळी किंवा फलधारणा त्यानंतर फळांची वाढ होत असताना जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशावेळी फवारणीद्वारे दिलेली विद्राव्य खते फार उपयोगी पडतात उत्पादनामध्ये वाढ होते.

फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यायची काळजी….

  • पाण्यामध्ये खत विरघळताना ते पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे.
  • ज्या पाण्यात कॅल्शियम जास्त असते अशा पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियम युक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते वापरण्याचे टाळावे.
  • बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये.
  • फवारणी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत करावी.
English Summary: an object of water disolve fertilizer and benifit of crop
Published on: 12 February 2022, 05:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)