Horticulture

किरकोळ बाजारात घाऊक पेक्षा भाजीपाला चार ते पाचपटीने महाग विकत घ्यावा लागतो. आपल्या खिशाला कशी चाट लागतेय याचा अंदाज तुम्हाला आला असेल आणि आला नसेल तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात तफावत कशी हे तुम्हाला बातमी मधून लक्षात येईलच

Updated on 10 February, 2022 12:27 PM IST

किरकोळ बाजारात घाऊक पेक्षा भाजीपाला चार ते पाचपटीने महाग विकत घ्यावा लागतो. आपल्या खिशाला कशी चाट लागतेय याचा अंदाज तुम्हाला आला असेल आणि आला नसेल तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात तफावत कशी हे तुम्हाला बातमी मधून लक्षात येईलच

भाज्याच्या या महागाई मागे दडलंय काय? भाजीवाल्याकडे गेल्यावर महाग झालेली भाजी पाहून नाईलाजाने भाजी विकत घेऊन निमूटपणे घरी येतो. शिवाय भाज्या किती महाग झाल्यात यावर चर्चा करतो. पाहा स्वस्त भाज्या ग्राहकांपर्यंत मात्र महागड्या दरात कशा पोहोचतात. मुंबई APMC आणि किरकोळ  भाजीपाला मार्केटमध्ये बाजारभावातील काय आहे तफ़ावत आज भाजीपाला बाजारात ६०० गाडी आवक झाली असून घाऊक बाजारभाव आणि किरकोळ बाजारभाव यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने महागाईने ग्राहक हैराण आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव आणि या मार्केटपासून हाकेच्या अंतरावर वाढलेले बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत.

घाऊक भाजीपाला बाजारभाव (प्रतिकिलो)  किरकोळ भाजीपाला बाजारभाव (प्रतिकिलो)

भेंडी ४० ते ५० रुपये                                   भेंडी १०० रुपये
वांगी ३० रुपये                                           वांगी १०० रुपये
शिमला ३० ते ४० रुपये                               शिमला ८० रुपये
घेवडा १० ते २० रुपये                                  घेवडा १०० रुपये
कारले  ५२ रुपये                                         कारले  १०० रुपये
कोबी  २० रुपये                                          कोबी  १२० रुपये
फ्लॉवर १० ते १२ रुपये                                फ्लॉवर १२० रुपये
गाजर  ३० रुपये                                         गाजर  १०० रुपये
काकडी १२ रुपये                                       काकडी १०० रुपये
दुधी- १० रुपये                                           दुधी- ८० रुपये
फरसबी-२० ते ३० रुपये                               फरसबी- १२० रुपये
वाटाणा-२० ते २५ रुपये                               वाटाणा- ६० रुपये 

मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये २०० गाड्यांची आवक; कांदा १५ ते ३०, बटाटा १० ते १४ तर लसूण ३० ते ७० रुपये प्रतिकिलो

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास ५३५ गाड्यांची आवक वाटाणा २० ते २५, काकडी १२, भेंडी ४० ते ५०, वांगी ३०, शिमला ३० ते ४०, कारले ५०, कोबी २०, फ्लॉवर १०, गाजर ३० रुपये प्रतिकिलो
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये २८० गाड्यांची आवक;सफरचंद- ९० ते १२०, संत्री -३० ते ४०, द्राक्ष -८० ते १००,
मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये १२५ गाड्यांची आवक सुक्यामेवा आणि मसाला दर स्थिर,
मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये जवळपास २२५ गाड्यांची आवक; डाळींच्या दरात अंशतः वाढ

English Summary: Although the market committee at a distance of hake, vegetables are four times more expensive; Unleash the wrath of the citizens
Published on: 10 February 2022, 12:27 IST