सध्याच्या जीवन शैलीमुळे अनेकांना बऱ्याच आजारांना (illness) सामोरे जावे लागते. बऱ्याच गंभीर समस्या उद्भवत असतात. यामधीलच एक गंभीर समस्या म्हणजे फुप्फुसांमध्ये (lungs) किंवा छातीत पाणी भरणे. ज्याला मेडिकल भाषेत पल्मोनरी एडिमा म्हणतात.
ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा वेळीच उपचार करणे गरजेचे असते.अडचण तेव्हा जास्त होते जेव्हा पाणी फुप्फुसात श्वासनलिकेत जमा होतं. याने व्यक्तीला श्वास घेण्यास मोठी अडचण येते.
फुप्फुसात पाणी भरण्याची कारणे
फुप्फुसात पाणी भरण्याचं मोठं कारण हृदयरोग आहे. याशिवाय निमोनिया, काही विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे, काही औषधं, छातीवर आघात होणे आणि उंचावर चढणे किंवा एक्सरसाइज करता नाही फुप्फुसात पाणी जाऊ शकते.
दिलासादायक! जेष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेने लाँच केली नवीन FD स्कीम; मिळणार तब्बल 8.40 % व्याज
फुप्फुसात पाणी भरल्याची लक्षणे
फुप्फुसात पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास, कफातून रक्त येणे, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा थंड होणे, श्वास घेताना धाप लागणे, थकवा, अस्वस्थता, चिंता, पाय आणि शरीराच्या इतर भागावर सूज येणे यांचा समावेश आहे.
काय आहेत उपाय
सोडियमचं सेवन कमी करा - शरीरात जास्त प्रमाणात मीठ असेल तर याने जास्त तरल पदार्थ तयार होतात. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मिठाचं सेवन कमी करा. आपल्या जेवणात मिठाऐवजी काळे मिरे, लसूण, लिंबाचा रस आणि इतर साध्या मसाल्यांचा समावेश करा.
वृषभ, कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मौज मजेचा; जाणून घ्या संपूर्ण राशींचे राशीभाविष्य
स्मोकिंग सोडा - स्मोकिंग करणं टाळा. कारण या स्थितीत समस्या आणखी गंभीर होऊ शकते. इतकंच नाही तर तुम्हाला सेकंड हॅंड धुरापासूनही बचाव केला पाहिजे. वातावरणाची अॅलर्जीपासून बचाव करा. कारण याने तुमच्या फुप्फुसात जळजळ होऊ शकते.
मद्यसेवन सोडा - मद्यसेवन आणि इतर नशेच्या पदार्थांच सेवन बंद करा. याने पल्मोनरी एडिमा समस्या होऊ शकते. यामुळे समस्या आणखी गंभीर होऊ शकते. ही समस्या होऊ द्यायची नसेल तर लगेच मद्यसेवन बंद करा.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ
सातारा जिल्ह्यात सोलर पॅनलवर चालणाऱ्या तब्बल 202 योजना मंजूर; शेतकऱ्यांना होणार फायदा
दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर
Published on: 04 October 2022, 01:45 IST