सध्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे अनेकांना अनेक छोटंमोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. सर्वात घातक आजार म्हणजे हृदयरोग (heart attack). हृदयरोगाचे प्रमाण वाढत असताना पाहायला मिळत आहे.
काही संकेत खूप गंभीर असतात. तुम्हाला हृदयरोग किंवा इतर कोणता रोग आहे का? हे दर्शवत असतात. यामधीलच महत्वाचे लक्षण म्हणजे जास्त घाम येणे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात वेगाने घाम येतो.
हृदयविकाराच्या झटका येताना येणारा घाम वेगळा असतो. द हेल्थ साईट डॉट कॉमने (The Health Site.com) दिलेल्या माहितीनुसार, व्यायामानंतर तसेच वेगात शारीरिक हालचाली केल्यानंतर किंवा उन्हामुळे आपल्याला घाम सुटतो तो सर्वसाधारण असतो.
नोव्हेंबर महिन्यात 'या' राशीच्या लोकांचे उजळणार भविष्य; उत्पन्नात होणार चांगली वाढ
पण, जेव्हा हृदय (heart) नीट काम करत नाही तेव्हा हा घाम वेगळाच असतो. म्हणजे यादरम्यान सर्वसाधारण घाम येण्याच्या कोणत्याही गोष्टी न करता अचानक शरीराला खूप घाम येऊ लागतो.
यासोबतच या काळात शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. जसे की धाप लागणे, मळमळणे, थकवा येणं आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. याशिवाय शरीराच्या अनेक भागातून जास्त घाम येणे सुरू होते. जसे...
दिलासादायक! 2 हजार 552 पशुपालकांच्या खात्यावर 6 कोटी रुपयांची रक्कम जमा
अशावेळी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारामध्ये बदल करणे गरजेचा आहे. जसे की दररोज 10,000 पावले चालणे, कमी तेलकट अन्न खाणे इ.
महत्वाच्या बातम्या
अतिवृष्टीचा तब्बल 29 लाख शेतकऱ्यांना मोठा फटका; शेतकरी नुकसान भरपाई मदतीच्या प्रतीक्षेत
काय सांगता! या झाडाची साल, लाकूड, पाने विकून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; वाचा...
सावधान! आरोग्य विमा घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Published on: 31 October 2022, 01:54 IST