Health

मित्रांनो खरं पाहता तूप हे आपल्या आरोग्यासाठी (Human Health) अत्यंत फायदेशीर मानले जाते. अन्नापासून ते चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुपाचे सेवन प्राचीन काळापासून केले जात आहे. आयुर्वेदमध्ये (Ayurveda) तुपाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. तूप हा अनेक आजारांवर (Disease) रामबाण उपाय आहे असे म्हटले तरी देखील काही वावगे ठरणार नाही.

Updated on 23 May, 2022 1:03 AM IST

मित्रांनो खरं पाहता तूप हे आपल्या आरोग्यासाठी (Human Health) अत्यंत फायदेशीर मानले जाते. अन्नापासून ते चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुपाचे सेवन प्राचीन काळापासून केले जात आहे. आयुर्वेदमध्ये (Ayurveda) तुपाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. तूप हा अनेक आजारांवर (Disease) रामबाण उपाय आहे असे म्हटले तरी देखील काही वावगे ठरणार नाही.

यामुळेच वजन वाढवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी तुपाचा (Ghee Health Benifits) वापर केला जातो. पण अनेकदा लोकांना गाय आणि म्हशीच्या तूपातील फरक कळत नाही. तुपाच्या रंगापासून ते दोन्ही प्राण्यांच्या पोषक घटकांपर्यंत सर्व काही वेगळे आहे. मित्रांनो आहार तज्ञांच्या मते, गाय आणि म्हशीचे तूप आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर आहे. त्यांच्यातील फरक आणि कोणते तूप शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे हेच आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

तेलाचा वारंवार उपयोग करताय का? मग, सावधान! होऊ शकतात हे घातक परिणाम

गाय आणि म्हशीच्या तूपातील फरक

»गाय आणि म्हशीच्या तुपातला सर्वात सामान्य फरक म्हणजे गाय आणि म्हशीच्या तुपाचा रंग वेगवेगळा असतो. म्हणजेच गाईच्या तुपाचा रंग पिवळा असतो, याचे कारण त्यात आढळणारे ए जीवनसत्व आहे.  तर म्हशीच्या तुपाचा रंग पांढरा असतो.

»गाईच्या तुपात अनेक पोषक तत्व असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

»व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि के, कॅल्शियम, खनिजे, पोटॅशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने, अधिक लोक गाईचे तूप वापरतात.

»म्हशीच्या तुपात चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांचे वजन कमी आहे, ते म्हशीचे तूप सेवन करतात. त्याचबरोबर गायीच्या तुपात फॅट कमी प्रमाणात आढळते, त्यामुळे वजन वाढत नाही.

»कारण म्हशीच्या तुपात चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते खराब होत नाही. पण तुम्ही गाईचे तूप जास्त काळ वापरू शकत नाही.

»दृष्टी वाढवण्यासाठी गायीचे तूप फायदेशीर मानले जाते.  त्यामुळे ज्यांना दृष्टी चांगली ठेवायची असेल त्यांनी गाईचे तूप सेवन करावे असा सल्ला दिला जातो.

Aayushman Card Yojana: 'या' सरकारी योजनेच्या माध्यमातून मिळणार 5 लाखांची मदत

गाईचे तूप खाण्याचे फायदे

»गाईचे तूप शरीराची ताकद वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

»ज्या लोकांचे वजन जास्त असते, त्यांनी गाईचे तूप खावे असा सल्ला नेहमी दिला जातो. कारण की गाईच्या तुपात फॅटचे प्रमाण खूपच नगण्य असते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होतं असते.

»ज्या लोकांना मायग्रेन आणि डोकेदुखीची समस्या असते अशा लोकांनी आवर्जून गाईचे तूप सेवन करावे असा सल्ला आहार तज्ञ देत असतात.

Health Tips: कुळीथ अथवा हुलगा खाण्याचे जबरदस्त फायदे; जाणुन तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

म्हशीचे तूप खाण्याचे फायदे

»ज्या लोकांना पोटाशी संबंधित विशेषता पचनाशी संबंधित विकार असतात त्या लोकांनी म्हशीचे तूप खावे असे सांगितले जाते. शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी म्हशीचे तूप फायदेशीर असते.

»म्हशीच्या तुपात जास्त चरबी आढळते, त्यामुळे वजन वाढवण्यासाठी म्हशीचे तूप सेवन केले जाते. यामुळे हाडे मजबूत होतात.

»ज्यांना मानसिक आजार आहेत त्यांच्यासाठी म्हशीचे तूप फायदेशीर मानले जाते. या तुपाच्या सेवणाने स्मरणशक्तीही तीक्ष्ण करते.

»म्हशीचे तूप वयाचा प्रभाव कमी करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.

सावधान! 'या' लोकांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नये; नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' घातक परिणाम

नेमकं म्हशीचे तूप चांगले का गाईचे?

बहुतेक डॉक्टर गायीचे तूप आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे सांगतात. कारण यामध्ये आढळणारे पोषक तत्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. गाईच्या तुपाने पचनक्रिया बरोबर राहते, त्यामुळे पचनाची समस्या कधीच होतं नाही. म्हशीच्या तुपात मोठ्या प्रमाणात चरबी आढळते, जे वजन वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

English Summary: Why cow ghee is more beneficial for health than buffalo; Read what experts have to say
Published on: 23 May 2022, 01:03 IST