सगळ्यांचे आवडते फळ म्हणजे आंबा फळाचा समावेश होतो. उन्हाळ्यात आंबा कधी बाजारात येतोय याची वाट सगळेजण बघत असतात. असे असताना अनेकजण आंबा खाल्ल्यानंतर लगेचच त्याच्या कोयी कचऱ्यात टाकतात. परंतु आंब्यासोबतच त्याच्या कोयीही खूप फायदेशीर आहेत. याबाबत अनेकांना माहिती देखील नाही. आंब्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ते शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात.
याचा फायदा म्हणजे आंब्याची कोय ही हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. यासाठी आंब्याच्या कोयीच्या पावडरचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पोट बिघडने, तसेच डायरियाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आंब्याच्या कोयी उपयुक्त ठरू शकतात. पोट बिघडल्यास आंब्याची कोय वाळवून पावडर बनवा आणि एक चमचा पाण्यासोबत घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
तसेच आंब्याची कोय कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहेत. कोयीची पावडर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच आपल्या दातांसाठी देखील कोयीची पावडर फायदेशीर ठरू शकते. सकाळ-संध्याकाळ दात घासल्याने दात मजबूत होतात. महिलांसाठी मासिक पाळीमध्ये काही महिलांना खूप रक्तस्त्राव होतो, अशावेळी आंब्याच्या कोयीची पूड मदत करू शकते.
वजन नियंत्रणासाठी आंब्याच्या कोयीची पावडर खूप फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हे खूप कामी येणार आहे. आंबे सर्वांनाच आवडतात, काही नागरिकांसाठी आंब्याशिवाय उन्हाळा अपूर्ण वाटत असतो.
आंब्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरले जाते आणि वारंवार भूक लागत नाही. आंब्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ते शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. कोयीची पावडर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
महत्वाच्या बातम्या;
Kharif Season: अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबत दिला मोलाचा सल्ला...
'सर्वांना घरे' ही राज्य सरकारची योजना माहिती आहे का? वाचा सविस्तर, सर्वांना मिळणार हक्काचे घर
मोठी बातमी! गव्हाच्या निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय, कारण आले समोर..
Published on: 15 May 2022, 02:54 IST