किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचे समस्या बऱ्याच लोकांना असते. उन्हाळ्यामध्ये तर किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त वाढतो.
जर देशाचा विचार केला तर जवळजवळ 40 टक्के लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहे तर त्यातील 13 ते 15 टक्के लोकसंख्या ला मुतखडाच्या समस्येने ग्रासले आहे. उन्हाळ्यामध्ये अचानक वाढलेली उष्णता, हवेतील आद्रता आणि पाण्याचा अभाव इत्यादी कारणे हे उन्हाळ्यात किडनी स्टोनचे समस्या बिकट होण्यासाठी कारणीभूत आहेत.
हिवाळ्यामध्ये देखील किडनी स्टोनचे समस्या येते परंतु त्याची तीव्रता उन्हाळाया ऋतूत जास्त जाणवते. यामध्ये लघवीला जळजळ होणे, लघवीतून रक्त येणे, मळमळ उलट्या ही सामान्य लक्षणे आहेत. परंतु यामध्ये एक महत्त्वाचे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अनेकदा किडनी स्टोन चा समस्याची कोणत्याही प्रकारची लक्षणे रुग्णांमध्ये दिसत नाही.या लेखामध्ये आपण किडनी स्टोन बद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
किडनी स्टोन म्हणजे नेमके काय?
मानवी मूत्रामध्ये खनिजे आणि क्षार असतात. जेव्हा लघवीतील खनिजे आणि क्षारांची पातळी एका ठराविक प्रमाणापेक्षा वाढते अशावेळी हे क्षार आणि खनिजांचे स्फटिक एकत्र येऊन त्यांचे दगडासारख्या पदार्थात रूपांतर होते.
तयार झालेला हा स्टोन मूत्रवाहिनी पर्यंत पोचतो व लघवीचा प्रवाह हा रोखला जातो त्यामुळे तीव्र वेदना होतात. या समस्येला किडनी स्टोन असे म्हणतात. किडनी स्टोन होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे कमीत कमी प्रमाणात घट्ट लघवी, उष्णतेत घाम येणे, व्यायाम करणे किंवा पुरेशा द्रवपदार्थाचे सेवन न करणे इत्यादी कारणांमुळे शरीरात द्रव्य पदार्थांची कमतरता तयार होते. त्यामुळे लघवी मध्ये जे क्षार असतात ते विरघळण्यासाठी पुरेसे द्रव्य पदार्थ नसणे हे घट्ट लघवीचे संकेत आहेत.
किडनी स्टोन होऊ नये यासाठी काय करावे?
किडनी स्टोन टाळण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे त्याची अगोदर कारणे माहीत करून घेणे हे होय. जेव्हा या स्टोनची तपासणी केली जाते आणि बाहेर काढलेल्या लघवीच्या काही विशिष्ट चाचण्या केल्या जातात. या सगळ्या प्रक्रियेद्वारे त्याची कारणे माहित पडतात.
मग त्या कारणानुसार आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्त्वाचे असते. तसेच औषधाने ते पुन्हा होण्यापासून थांबवता येतो. किडनी स्टोन चा समस्यांमध्ये लघवीला अडथळा निर्माण झाल्याने तीव्र वेदना होतात. रुग्णाला उलट्या किंवा लघवी करण्यास त्रास होतो.
किडनी स्टोन मुळे होणाऱ्या वेदना बऱ्याचदा कमरेच्या सभोवती पसरतात. अशा वेळी पाणी पाण्याचे प्रमाण वाढवावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.
महत्वाच्या बातम्या
Published on: 28 May 2022, 09:52 IST