मान्सूनचे देशात आगमन झाले असले तरी देखील अजून मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. आपल्या राज्यात अजूनही हवामान उष्ण आहे. अशा परिस्थितीत लोकांना अशा गोष्टी खायला आवडतात ज्यामुळे शरीराला थंडावा मिळेल.
यामध्ये काकडी हे सर्वात जास्त आवडणारे फळ आहे. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि कॉपरने समृद्ध असलेली काकडी तुम्हाला हायड्रेट ठेवतेच पण अनेक रोगांचा धोका कमी करण्यासही मदत करू शकते. परंतु त्याचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे असूनही, काकडी खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. चला तर मग जाणून घेऊया काकडीचे दुष्परिणाम.
रात्री काकडी का खाऊ नये
काकडीचे जास्त सेवन केल्याने काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तुम्ही तुमच्या आजी किंवा आई-वडिलांना रात्री काकडी खाऊ नका असे सांगताना ऐकले असेल बरोबर ना! मग असं का सांगितलं जातं बरं, खरं पाहता यामागे एक कारण आहे. रात्री झोपण्यापूर्वी काकडी खाल्ल्याने झोप येते. यामुळे काकडी रात्री खाऊ नये असा सल्ला दिला जातो.
या लोकांनी काकडीचे सेवन करू नये
जर तुम्हाला आधीच पोटाशी संबंधित गंभीर आजार असेल तर तुम्ही दुपारच्या जेवणादरम्यान काकडीचे काही तुकडे घेऊ शकता, परंतु त्यानंतर नाही. काकडीमध्ये कुकुर्बिटिन असल्याने काकडीचे जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर लगेच सेवन केल्याने काही लोकांमध्ये अपचन होऊ शकते.
आम्ही तुम्हाला काकडी खाणे कायमचे बंद करण्यास सांगत नाही आहोत. तुम्ही ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे. दिवसातून संतुलित प्रमाणात काकडी खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही. त्याऐवजी, ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवतील, हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देतील आणि वजन कमी करण्यात मदत करतील.
Disclaimer: ही माहिती आयुर्वेदिक माहितीच्या आधारे लिहिली गेली आहे. Krishi Jagaran Maharashtra त्याच्या यशाची किंवा त्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. त्यांचा वापर करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Published on: 04 June 2022, 09:26 IST