Walnut Benefits : मित्रांनो सुकामेवा मध्ये अक्रोडचे (Walnut) महत्त्वाचे स्थान आहे. अक्रोड मध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी (Health Tips) विशेष लाभप्रद असल्याने डॉक्टर अक्रोड खाण्याचा सल्ला देत असतात. अशा परिस्थितीत आज आपण अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो अक्रोड असंच खाण्यापेक्षा भिजवून खाल्ल्याने (Soaked Walnut Benefits) या पासून आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होत असतात. चला तर मग मित्रांनो भिजवुन अक्रोड खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात या विषयी जाणून घेऊया.
मित्रांनो जर तुम्हाला अक्रोड पचवण्यास त्रास होत असेल तर तुम्ही अक्रोड भिजवून सेवन करावे. यामुळे तुम्हाला पचनामध्ये कोणतीही समस्या येणार नाही. यासोबतच तुम्हाला अधिक फायदे देखील मिळणार आहेत.
मधुमेह टाळण्यास मदत होईल: मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रोड टाईप 2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असेल अशा लोकांनी निश्चितच रोज भिजवलेले अक्रोड खावे. यामुळे टाईप टू डायबिटीस कंट्रोल राहण्यात मदत होणार आहे.
पचनासाठी चांगले: याशिवाय तज्ञांनी सांगितले आहे की, भिजवलेले अक्रोडाचे सेवन केल्यास पचनक्रियेची समस्या उद्भवत नाही. वास्तविक, भिजवून खाल्ल्याने त्यात फायबरचे गुणधर्म तयार होतात ज्यामुळे पचना संबंधित सर्व विकार दूर होतात शिवाय बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो. निश्चितच अक्रोड भिजवून खाल्ल्याने मानवी शरीराला अधिक फायदे होतात.
हाडे मजबूत करते: जाणकार लोकांनी असा दावा केला आहे की, भिजवलेल्या अक्रोडात अल्फा लिनोलेनिक ऍसिडचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.
तणावही कमी होतो: भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने शरीराला ओमेगा 3 न्यूट्रिशन मिळते, ज्यामुळे तुमची स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत होते.
वजनही कमी होते: भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते.
Published on: 22 September 2022, 02:35 IST