देशात सगळीकडे उन्हात प्रचंड वाढ होत आहे. आगामी काही दिवसात तापमानात अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हामुळे अनेकदा मानवी आरोग्य धोक्यात सापडते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात प्रामुख्याने अतिसार पित्त डिहायड्रेशन अपचन यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी व मानवी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन केले पाहिजे. यामुळे या समस्येपासून लांब राहणे शक्य होत असते.
आपण उन्हाळ्यात नारळ पाणी, लिंबू पाणी, फळांचे ज्यूस हे देखील सेवन करू शकतो. डॉक्टरांच्या मते, आपण उन्हाळ्यात थकवा घालवण्यासाठी नेहमीच सरबत सेवन करणे अधिक पसंत करतो यामुळे आपणास तात्पुरता दिलासा देखील मिळत असला तरीदेखील यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते तसेच यामुळे वजन वाढण्याचा देखील धोका कायम असतो.
म्हणून उन्हाळ्यात सरबत सेवन करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, उन्हाळ्यात नव्हे-नव्हे तर बारामाही उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. विशेषता तळलेले पदार्थ या दिवसात खाणे टाळावे.
मित्रांनो जर आपणास उन्हाळ्याच्या दिवसात गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर आपण आंब्याचे सेवन करू शकता. बाहेर मिळत असलेले गोड पदार्थ खाणे या दिवसात टाळावे. त्यामुळे आपण गोड पदार्थ खाणे ऐवजी आंब्याचे सेवन करू शकता यामुळे आपले गोडी पदार्थ खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल तसेच आपल्या शरीराला पोषक घटक देखील मिळतील.
असे असले तरी, आंब्याचे सेवन जेवणानंतर लगेचच करू नये आंब्याचे सेवन सकाळी नाश्त्यानंतर थोड्यावेळाने करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त आईस्क्रीम देखील सेवन केले जाऊ शकते मात्र आईस्क्रीम देखील जेवणानंतर लगेच खाऊ नका कारण की आईस्क्रीम पचायला देखील उशीर लागतो.
उन्हाळ्यात अनेक लोकांना ब्लड प्रेशर ची समस्या प्रामुख्याने जाणवत असते. त्यामुळे अशा लोकांनी सकाळी तसेच रात्री जेवण केले पाहिजे. अनेक जण कामाच्या तणावात तसेच वजन कमी करण्यासाठी एक वेळचे जेवण कमी करतात मात्र, जेवण टाळणे हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
अनेक लोकांना उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय असते. जाणकार लोकांच्या मते ही सवय पूर्णतः चुकीची असून कोणीही उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये याऐवजी आपण साधे पाणी द्यावे जेणेकरून आरोग्याला कुठलीही हानी पोहचणार नाही. काही लोक बाहेरून आल्यानंतर लगेचच जेवण करतात हे देखील साफ चुकीचे आहे यामुळे अतिसारची समस्या उद्भवू शकते.
Health Tips: गूळ खाल्ल्यानंतर लगेचच कोमट पाणी प्या; मिळतील जबरदस्त फायदे; वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Published on: 25 March 2022, 02:03 IST