Health

डाळींना प्रोटीनचे पावर हाऊस मानले जाते. जे लोक व्हेजिटेरियन असतात. लोक आपल्या शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी जास्त प्रमाणात डाळींचा वापर करतात. डाळींचे वेगळे प्रकार आहे, जशी मूग डाळ परंतु डाळींच्या सगळ्या प्रकारांमध्ये उडीद डाळ चांगली आहे.

Updated on 16 January, 2021 1:27 PM IST

डाळींना प्रोटीनचे पावर हाऊस मानले जाते. जे लोक व्हेजिटेरियन असतात. लोक आपल्या शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी जास्त प्रमाणात डाळींचा वापर करतात. डाळींचे वेगळे प्रकार आहे, जशी मूग डाळ परंतु डाळींच्या सगळ्या प्रकारांमध्ये उडीद डाळ चांगली आहे.

आपण बऱ्याच प्रकारच्या डाळी यांचा आहारात समावेश करतो. परंतु आपल्याला माहिती आहे का, कि डाळींमध्ये प्रोटीनच्या ऐवजी कोणते पोषक तत्व असतात. आपण या लेखात उडीद काळच्या पोषक तत्वाविषयी माहिती घेणार आहोत. उडीद डाळच्या सेवनाने तुम्हाला प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटामिन बी, आयर्न, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व मिळतात. गर्भवती महिलांसाठी उडीदाचे सेवन फायदेशीर मानले जाते. उडीद डाळ खाण्याचे फायदे पाहूया.

हेही वाचा : फळांच्या सालींमध्ये लपला आहे बऱ्याच आजारावरील उपचार

  पचनासाठी आवश्यक

 उडीद डाळींमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. जर तुम्हाला लूज मोशन, कब्ज सारख्या समस्यांनी ग्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या हातामध्ये उडीद डाळ समावेश करणे आवश्यक आहे. नर्व्हस सिस्टिमला मजबूत करते त्यासोबतच मस्तिष्कला आरोग्यदायी बनवते. अंशिक पक्षाघात, पॅरालिसीस, चेहऱ्याचा पक्षघात अशा अन्य प्रकारच्या आजारांसाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी उपयोगी असते.

 

एनर्जी बूस्ट  साठी आवश्यक

 उडीद डाळ मध्ये आयरन कन्टेन्ट जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे शरीरामधील एनर्जी पातळीला वाढवून अधिक ऍक्टिव्ह बनवण्याचे कामी मदत करते. आयर्न लाल रक्तपेशी उत्पादित करण्याला प्रोत्साहित करण्याच्या कामी मदत करते. जय शरीराच्या सगळ्या अंगांमध्ये ऑक्सिजन पोचवण्याची जबाबदारी पार पडते. ज्या गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता असते. अशा महिलांसाठी फायदेशीर आहे.

   हृदयासाठी आवश्यक

 उडीद डाळ मध्ये फायबर सारखी घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर शरीरामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करून हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो हृदयासंबंधी असलेल्या समस्या कमी होतात. तसेच यामध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो.

 

हेही वाचा  : अंजीर खाण्याचे फायदे माहिती आहेत का ? वाचा संपुर्ण माहिती

  हाडांसाठी  आहे महत्त्वाचे

 हाडांना मजबूत बनण्यासाठी उडीदडाळ जे सेवन करणे आवश्यक आहे. उडीद डाळ मध्ये मॅग्नेशियम,, आयर्न, पोटॅशियम, फास्फोरस आणि कॅल्शियम सारखे महत्वपूर्ण खनिजे असल्यामुळे ते बोन मिनरल डेन्सिटी मजबूत बनण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

English Summary: Urad Dal: Strengthens the nervous system, is beneficial for pregnant women
Published on: 16 January 2021, 01:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)