Health

शरीराचे आरोग्य ठणठणीत आणि उत्तम ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या भाजीपाला तसेच फळांचा आणि अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेल्या आहाराचा समावेश करावा लागते. कारण शरीराच्या पोषणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी बऱ्याच प्रकारचे पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. त्यापैकी असे बरेच भाजीपाला वर्गीय पिके आहेत ज्याचा आपण आहारामध्ये भरपूर वापर करतो.

Updated on 28 July, 2022 3:12 PM IST

 शरीराचे आरोग्य ठणठणीत आणि उत्तम ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या भाजीपाला तसेच फळांचा आणि अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेल्या आहाराचा समावेश करावा लागते. कारण शरीराच्या पोषणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी बऱ्याच प्रकारचे पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. त्यापैकी असे बरेच भाजीपाला वर्गीय पिके आहेत ज्याचा आपण आहारामध्ये भरपूर वापर करतो.

जिभेचे चोचले न पुरवता आपल्या शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी काय आवश्यक आहे याच्याकडे लक्षात देऊन आहाराचे नियोजन केले तर नक्कीच आरोग्यविषयक समस्या जास्त प्रमाणात उद्भवत नाहीत.

आता आपण टोमॅटो हा सर्रासपणे आहारात वापरतो. परंतु जर टोमॅटो पासून मिळणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांचा विचार केला तर हे एक सुपरफुड पेक्षा कमी नाही. या लेखामध्ये आपण टोमॅटोच्या काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.

नक्की वाचा:Health Tips: पावसाळ्यात गूळ आणि दूध एकत्र खाल्ल्यास मिळतात हे आश्चर्यकारक फायदे, वाचून विश्वास बसणार नाही

टोमॅटोचे आरोग्यदायी फायदे

1- एंटीऑक्सीडेंटचा समृद्ध स्त्रोत- टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे एक कॅरोटेनोईड असते व त्याच्यात अँटिऑक्सिडंट चे गुणधर्म असतात.

त्यामुळे आपल्याला टोमॅटोचा जो काही रंग आहे तो लालसर दिसतो. हे लायकोपीन फ्री रॅडिकल्स सोबत लढण्या व्यतिरिक्त शरीरातील कोलेस्टेरॉल देखील कमी करण्यासाठी मदत करते. तसेच रक्तवाहिन्या कठीण म्हणजेच कडक होण्यापासून थांबवते व रक्त गोठण्याच्या धोका कमी होतो.

2- डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त- टोमॅटो मध्ये ल्युटिन आणि झेक्स्यानथीन नावाचे कॅरोटेनोईड देखील असतात. आपल्या डोळ्यातील पडदा व डोळ्यांच्या लेन्स असतात त्यामध्ये आढळतात. या कॅरोटेनोईडमुळे डोळ्यांना नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी प्रकाश व हानीकारक किरणे फिल्टर केले जातात.

नक्की वाचा:Health Tips: आपल्या आहारात या 5 पदार्थाचा समावेश करा, अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन मिळेल

3- हृदयविकाराचा धोका कमी होतो-टोमॅटोमध्ये विटामिन सी, फ्लेवोनॉइड्स,  विटामिन इ, लायकोपीन, बीटा कॅरोटीन इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.ते लिपोप्रोटीन आणि संवहनी पेशींचे ऑक्सिडेशन पासून संरक्षण करतात.

तसे पाहायला गेले तर ऑक्सिडेशन मुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक जमा होतो, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. टोमॅटोमुळे रक्तदाब आणि वाईट कोलेस्टेरॉल हे कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

4- करते कॅन्सरपासून बचाव- टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन असते. या बाबतीत अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या संशोधनात आढळून आले की लायकोपीन आणि बीटा कॅरोटीन दोघे एकत्रपणे प्रोस्टेट कॅन्सर,स्तनाचा कॅन्सर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी करतात.

नक्की वाचा:Non Vegetarian Diet: मासे आहेत आरोग्यासाठी चांगले, परंतु कोणते? हे ही आहे महत्वाचे,वाचा महत्वाची माहिती

English Summary: tomato involve in diet so get more health benifit from tomato
Published on: 28 July 2022, 03:12 IST