Health

सिगरेट पिण्याची सवय बऱ्याच जणांना असते. आता तरखूपच लहान वयापासून बऱ्याच जणांना सिगारेट पिण्याची सवय आहे. सगळ्यांना माहिती आहे की धूम्रपान आरोग्यासाठी खूप वाईट आहे.

Updated on 27 April, 2022 10:20 PM IST

 सिगरेट पिण्याची सवय बऱ्याच जणांना असते. आता तरखूपच लहान वयापासून बऱ्याच जणांना सिगारेट पिण्याची सवय आहे. सगळ्यांना माहिती आहे की धूम्रपान आरोग्यासाठी खूप वाईट आहे.

. त्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होत असतो. इतकेच नाही तर सिगारेट ओढल्याने कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटका देखील येण्याचा संभवअसतो. वास्तविक पाहता धुम्रपानाचे  आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम बहुतांशी सगळ्यांना माहिती आहेत. बऱ्याच जणांना सिगारेट सोडण्याची इच्छा देखील असते परंतु सुटत नाही. अशा व्यक्तींसाठी हा लेख महत्त्वाचा ठरू शकतो.  या लेखात आपण धूम्रपान सोडण्याचे घरगुती उपाय बद्दल माहिती घेऊ.

 सिगारेट सोडण्याचे घरगुती उपाय

1- भरपूर पाण्याचे सेवन- जर दिवसभर भरपूर पाणी प्यायले तर शरीरातून अनेक टॉक्सिक घटक बाहेर पडण्यास खूप मदत होते.जेवणाच्या पंधरा मिनिटे आधी एक ग्लास पाणीप्या,त्यामुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रिया नियंत्रित राहते. त्यामुळे धूम्रपान करण्याची सवय देखील हळू सुटण्यास मदत होते.

2-दररोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकुन प्यायले तर सिगरेट पिण्याची सवय सोडण्यास मदत होते.

3-किसलेला मुळा खाल्याने देखील चेन स्मोकर किंवा वाईट व्यसनामुळे ग्रस्त आहेत अशांना फायदा होऊ शकतो.हा मधासोबत देखील खाता येतो.

4-जेव्हा जेव्हा तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटते त्यावेळी तुम्ही लिकीसिसचे दात घेऊ शकता आणि ते चावू शकता असं केल्याने धुम्रपान करण्याची इच्छा कमी होते.

5- जेव्हा तुम्हाला धुम्रपान करण्याची इच्छा होते तेव्हा एक ग्लास पाण्यात चिमूटभर लाल तिखट घाला आणि ते पिऊन घ्या. त्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

6- एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा मिसळल्यास आणि काही दिवस नियमित जेवल्यानंतर प्यावे.त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन हळूहळू सुटण्यास मदत होते.

7-जिनसेंग औषधी वनस्पती असून शरीरातील कॉर्टिसॉल ची पातळी कमी करतआणि शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवते. त्यामुळे तुम्हाला सिगारेट ओढू वाटणार नाही.

 

( टीप- या लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून त्यासाठी वैयक्तिक आणि कृषीजागरण समूह त्याची हमी देत नाही. वरील उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:दुधातील भेसळ ओळखण्याच्या या आहेत सोप्प्या पद्धती

नक्की वाचा:लष्करी अळी पासून होईल सुटका! ऑक्सीटेक आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने केलें नाविन्यपूर्ण जीएम तंत्रज्ञान विकसि

नक्की वाचा:शेतीपयोगी यंत्रांचा जादूगार अन शेती मध्ये नवनवीन कृषी यंत्र बनविणारा अवलिया! ..... श्री नामदेवराव आनंदराव वैद्य

English Summary: thise is domestic remedies useful in qwit smoking habbits
Published on: 27 April 2022, 10:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)