Health

हार्टअटॅक सध्या भयानक स्वरूप धारण करीत आहे. आपण बातम्या वाचतो किंवा ऐकतो की, अगदी 30 ते 40 वर्षा दरम्यान असलेल्या व्यक्तींमध्ये देखील हार्ट अटॅकचा धोका वाढलेला आहे.

Updated on 05 June, 2022 10:22 AM IST

हार्टअटॅक सध्या भयानक स्वरूप धारण करीत आहे. आपण बातम्या वाचतो किंवा ऐकतो की, अगदी 30 ते 40 वर्षा दरम्यान असलेल्या व्यक्तींमध्ये देखील हार्ट अटॅकचा धोका वाढलेला आहे.

मागील काही दिवसांपासून अगदी तरुण चित्रपट अभिनेत्यांचा जरी विचार केला तरी 35 ते 45 दरम्यान असलेले हे अभिनेतेहार्ट अटॅकने आपल्याला सोडून गेले.परंतु यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की,कुठलीही गोष्ट एकपूर्वसूचना दिल्याशिवाय येत नाही.

जणू हा काही निसर्ग नियमच आहे. तसेच हार्ट अटॅक येण्या अगोदर काही पूर्वसूचना नक्कीच देतो, परंतु आपण आपल्या कामाच्या दगदगीमध्ये याकडे साफ दुर्लक्ष करतो व गंभीर परिणामांना सामोरे जातो. जर आपण हार्ट अटॅक ची संकेत  लवकर ओळखले तर भविष्यकाळात होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून आपला बचाव करू शकतो. या लेखामध्ये आपण हार्टअटॅकची पूर्वी ची लक्षणे व अशी लक्षणे दिसल्यास करायचे उपाय याबद्दल माहिती घेऊ.

 हार्ट अटॅक येण्याची कारणे

 सगळ्यांना माहीत आहे की शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की हार्ट अटॅक येतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे दोन प्रकारअसून यापैकी एक चांगला आणि दुसरा विपरीत परिणाम करणारा असतो.

जेव्हा विपरीत परिणाम करणाऱ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण शरीरामध्ये वाढते तेव्हा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. शरीरात हे कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी आपली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धती व सवयी  या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहे.

नक्की वाचा:Important Research: कॅल्शियमच्या गोळ्या खातात का? तर सावधान! या गोळ्यांमुळे वयस्करातील हृदयविकाराने 33 टक्के वाढते मृत्यूची शक्यता

हार्ट अटॅक येण्यापूर्वी ची लक्षणे

1-छाती दुखणे व चक्कर येतात.

2-श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो तसेच थंड घाम,मळमळते किंवा डोके हलके वाटते.

3- अचानक थकवा जाणवायला लागतो व छातीत अस्वस्थते सोबत धाप लागायला लागते.

4-हात आणि खांदे दुखायला लागतात.त्या लक्षणांमध्ये दोन्ही हात किंवा एक हात,पाठ, मान, जबडा,पोटामध्ये वेदना किंवा अस्वस्थता यांचा समावेश असतो.

 हार्ट अटॅक येऊच नये  यासाठी या गोष्टी केलेल्या चांगल्या

 ब्रिटिश हार्ट फाउंडेशन याबाबतीत म्हणते की,जर तुम्ही पूर्ण दिवसभर कार्यशील राहिला तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका जवळजवळ 35 टक्क्यांनी कमी होतो.याउलट तुम्ही दिवसभर आराम करत आहात तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका हा वाढतो.

याबाबतीत युएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ च्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराच्या आजारांपैकी अंदाजे 35 टक्के जे मृत्यू  होतात,  ते फक्त शरीर इनऍक्टिव्ह राहिल्याने होतात. त्यामुळे दररोज काहीतरी काम करीत राहणे आणि शरीर ऍक्टिव्ह होणे महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:तुमच्या शरीरात लोहाची कमतरता आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी, होईल फायदा

 दररोज व्यायाम केल्याने धोका होतो कमी

 शरीरामध्ये बहुसंख्य स्नायू असतात त्यापैकी हृदय हे देखील एक स्नायू आहे.त्यामुळे त्याचा देखील व्यायाम केला तर फायदा होतो.

जर तुमचे हृदय भक्कम असेल तर कोणताही प्रयत्न याशिवाय तुमच्या शरीरात रक्त पंप करण्यास सक्षम असेल.जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर तुमचे हृदय व पर्यायाने रक्ताभिसरण प्रणाली चांगली काम करते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते व रक्तदाब पातळी देखील निरोगी राहते.त्यामुळे व्यायाम फार महत्वाचा आहे. तज्ञांच्या मते तुम्ही आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे वर्कआउट केले पाहिजे. धूम्रपान बंद केले पाहिजे जर धुम्रपान करत असाल तर धूम्रपानामुळे शरीरातील धमन्या यांचे नुकसान होते.दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

नक्की वाचा:यकृताची (लिव्हरची) कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूर्ववत करण्यासाठी आश्चर्यजनक नैसर्गिक उपाय

English Summary: this symptoms before heart attack so give attention on that and take care
Published on: 05 June 2022, 10:22 IST