Health

झोपणे हे आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. रात्री शांतपणे निवांत झोपणे म्हणजे दुसऱ्या दिवशी कामामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते व उत्साह देखील जाणवतो.

Updated on 26 April, 2022 9:43 PM IST

झोपणे हे आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. रात्री शांतपणे निवांत झोपणे म्हणजे दुसऱ्या दिवशी कामामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते व उत्साह देखील जाणवतो.

परंतु अशी बरीच कारणे आहेत की त्यामुळे रात्री शांत झोप येत नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी काम तर व्यवस्थित होतच नाही परंतु कायम चिडचिड, निस्तेज चेहरा, कुठलीही गोष्ट कंटाळवाणे वाटायला लागते. त्यामुळे रात्री शांतपणे झोप लागणे फार महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण रात्री शांतपणे झोप न येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊ.

 शांतपणे झोप येण्याची कारणे

1- झोपेच्या वेळेचे चुकीचे नियोजन

2- कामाचा असलेल्या प्रचंड ताण व वैयक्तिक आयुष्यातील काही ताण तणाव

3-पचनशक्ती कमजोर असणे.

4-सकारात्मक दृष्टिकोन न ठेवता कायमच नकारात्मक गोष्टींचा विचार दिवसभर करणे.

5- आहारामध्ये जास्त करून तेलकट आणि तिखट पदार्थांचा वापर करणे.

 हे उपाय करा आणि रात्री झोपा शांतपणे

1- जर रात्री शांत झोप लागण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम उपाय म्हणजे झोपण्याच्या वेळेचे अचूक नियोजन. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला साधारण किती वाजता रात्री झोप येते आणि झोपल्यानंतर किती वाजता झोप पूर्ण होते हे ठरवून घेणे महत्त्वाचे आहे.

नियमितपणे  ठरलेल्या वेळेला झोपा आणि उठण्याच्या ठरलेल्या वेळेला उठा.

2- कधीही वैयक्तिक आयुष्यातील आणि सामाजिक जीवनातील कुठल्याही गोष्टींचा जास्त ताण घेऊच नका. जर तुम्ही ताणतणावात असाल तर तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही. त्यामुळे झोपण्या अगोदर तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे ऐका किंवा एखाद्या आवडीचे पुस्तक वाचले तर खूपच फायदा होतो.

3- रात्री झोपण्यापूर्वी कपभर कोमट दुधामध्ये एक चमचा मध घालून प्या. रात्री शांतपणे झोप येते.

4- रात्री जेवण केल्यानंतर पायी अर्धा तास फिरणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पचन शक्तीत सुधारणा होते आणि  जेवण कराल  तेव्हा तेलकट, आंबट आणि अति तिखट पदार्थांचा समावेश करणे टाळा. रात्री भरपेट खाऊ नका त्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या होणार नाही आणि झोप उत्तम येईल.

6-झोपताना तुमच्या तळपायला नारळाचे तेल चोळून घ्या त्यामुळे तुम्हाला नक्कीच उत्तम झोप लागेल.

7- रात्री झोपण्याअगोदर डोक्याला हलक्या हाताने चांगली मालिश करा. मालिश केल्याने रक्ताभिसरण उत्तम राहील आणि शांत झोप लागेल.

8- झोपताना सैल आणि शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला. त्यामुळे झोपताना अडचण येणार नाही आणि डासांपासून संरक्षण मिळते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:अतिशय महत्त्वाचे! खार जमीन असेल तर या पद्धतीने शक्य आहे खार जमीन सुधारणा, वाचा सविस्तर

नक्की वाचा:85 ते 100 दिवसात तयार होतो मधुमका, लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल चांगले उत्पादन अन मिळेल हिरवा चारा

नक्की वाचा:पीएम किसान सन्मान योजनेच्या नावाखाली महाराष्ट्रातील २६ हजार अपात्र लोकांची नावे समोर, ११ कोटी निधी सरकारकडे ओळवला जाणार

English Summary: this remedy is useful for good situation of sleeping at night
Published on: 26 April 2022, 09:43 IST