Health

मधुमेह एक समस्या आहे ज्याचे निदान करणे सोपे नाही. अशा स्थितीत मधुमेह शरीरात हळूहळू वाढतो आणि काहीवेळा तो इतका वाढतो की तो व्यक्तीच्या मृत्यूचे कारण बनतो. या आजाराबाबत कोणत्याही व्यक्तीने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

Updated on 22 June, 2022 6:04 PM IST

मधुमेह एक समस्या आहे ज्याचे निदान करणे सोपे नाही. अशा स्थितीत मधुमेह शरीरात हळूहळू वाढतो आणि काहीवेळा तो इतका वाढतो की तो व्यक्तीच्या मृत्यूचे कारण बनतो. या आजाराबाबत कोणत्याही व्यक्तीने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

कारण हा आजार असाध्य आहे, परंतु व्यवस्थित काळजी घेतली तर या आजारावर नक्कीच नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. या लेखात आपण मधुमेहाची रात्री दिसणारी काही लक्षण पाहू.

 मधुमेहाची रात्री दिसणारे लक्षण

 या लेखामध्ये आपण मधुमेहाच्या अशा काही लक्षण बद्दल माहिती घेणार आहोत, जी लक्षण रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात दिसून येतात. या लक्षणांवरून आपण टाईप 2 डायबेटिसचे सहज निदान करू शकतो.

नक्की वाचा:नक्की वाचा:जंगली बदाम आहे खूपच औषधी गुणधर्मयुक्त, जाणून घ्या जंगली बदामाच्या आरोग्यदायी फायदे

1- रात्री वारंवार लघवी होणे- जर तुम्ही रात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठत असाल तर तुम्हाला टाइप 2 मधुमेह असल्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लवकर डॉक्टरकडे जाऊन मधुमेहाची तपासणी करू शकतात.

यामागचे कारण असे सांगितले जाते की वारंवार लघवी करून शरीर रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकते. जेव्हा तुमचा स्वादुपिंडात अत्यंत कमी प्रमाणात इन्सुलीन तयार करू लागते तेव्हा टाइप 2 मधुमेह याची समस्या दिसून येते.

नक्की वाचा:Health Tips:वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आहारात 'या' फळांचा करा समावेश, होईल फायदा

 इन्शुलिन हे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते आपल्याला माहित आहे. अशा परिस्थितीत जेव्हा शरीरात इन्सुलिनचे उत्पादन कमी होऊ लागते,

तेव्हा ते ग्लुकोजचे प्रमाण वाढवते. यामुळे उच्च रक्तातील साखरेचे समस्या उद्भवते.अशा परिस्थितीत जर तुम्हालाही रात्री वारंवार लघवी होत असेल तर काळजी घ्या. कारण ही लक्षणे मधुमेहाची ही असू शकतात.

( टीप- हे माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून सामान्य माहितीवर आधारित आहे.

त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. कुठलाही उपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा )

नक्की वाचा:'या'5 अत्यावश्यक भारतीय मसाल्यांमध्ये आहे बरेच आजार चुटकीसरशी पळवण्याची ताकत

English Summary: this is syptoms at night can diebites so take precaution and take help to doctor
Published on: 22 June 2022, 06:04 IST