जर आपण निरोगी शरीराचा विचार केला तर यासाठी खूप काही छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यांच्याकडे लक्ष पुरवणे गरजेचे असते. यामध्ये खूप काही बाबी सांगता येतील. तसेच एक छोटीशी गोष्ट ही आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशा या छोट्याशा महत्त्वाच्या बाबी बद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' अन्नपदार्थ, फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
तोंड न धुता सकाळी पाणी पिण्याचे फायदे
जर आपण सकाळी उठल्यानंतर शिळ्या तोंडाने म्हणजेच ब्रश न करता एक ग्लास पाणी पिण्याचे महत्त्व आयुर्वेदात देखील सांगितले आहे. जर आपण सकाळी ब्रश न करता पाणी पिले तर तोंडात असलेली जी काही लाळ असते ते पाण्यात मिसळून पोटात गेल्यावर हानीकारक जीवाणू नष्ट करते. तसेच रिकाम्या पोटी पाणी पिल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
1- अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. त्यामुळे आंबट ढेकर येतात. हे टाळण्यासाठी सकाळी तोंड न धुता पाणी पिणे गरजेचे आहे.
2 किडनीचे आरोग्य- शिळ्या तोंडाने पाणी प्यायल्यामुळे किडनीशी संबंधित अनेक समस्या दूर होतात व किडनी साफ होते.
3- संसर्गापासून शरीराचा बचाव- आपल्याला माहित आहेच वातावरणातील किंवा इतर गोष्टींचा शरीराला पटकन संसर्ग होतो. अशा संसर्गापासून शरीराच्या बचावासाठी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय लावणे फार गरजेचे आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात व पोट साफ होते.
4- नवीन पेशींची निर्मिती- पाणी हे विषारी पदार्थ रक्तात मिसळू देत नाही त्यामुळे नवीन पेशी आणि स्नायू तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते.
5- बुद्धी तेजस्वी बनते- जर आपण मेंदूचा विचार केला तर सत्तर टक्के शरीराप्रमाणे यामध्ये पाणी असते. त्यामध्ये मेंदू हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे येणारा तणाव व अशक्तपणा दूर करण्यासाठी शिळ्या तोंडाने पाणी पिण्याची सवय लावणे गरजेचे आहे.
6- चयापचय वाढवणे- सकाळी शिळ्या तोंडाने पाणी प्यायल्यामुळे पोटात लाळ आल्यामुळे चयापचय गती वाढते.
7- केसांसाठी उपयुक्त- ब्रश न करता पाणी पिल्यामुळे केसांना देखील खूप फायदा मिळतो. यामुळे केसांच्या मुळांना मजबुती तर मिळतेच पण केस मजबूत होतात.
8- वजन कमी होण्यास मदत- सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते व रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने भूक कमी होते. ज्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.
(टीप- वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्याअगोदर किंवा आहारात बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Published on: 26 September 2022, 04:49 IST