किडनी स्टोन अर्थात मुतखडा एक सामान्य समस्या असून बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास असतो. परंतु योग्य वेळी योग्य उपचार केल्याने मुतखडा लवकर बरा होतो. शरीरातील काही प्रकारचे खनिजे आणि क्षार जेव्हा स्टोनचे रूप घेतात तेव्हा त्याला आपण किडनी स्टोन अथवा मुतखडा झाला असे म्हणतो.
जर आपण मुतखड्याचा विचार केला तर हे स्टोन अर्थात खड्यांच्या आकाराचा विचार केला तर साधारणतः मुगाच्या दाणे एवढ्या आकाराचे ते असतात. साधारणतः मुतखडा होण्यामागील कारणांचा आपण विचार केला तर शरीरातील पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण सांगता येईल.
कारण संशोधनानुसार असे दिसून आले आहे की,यूरिक ॲसिड मेण्टेन करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे असून कमी पाणी पिणे हे किडनी स्टोन होण्याला निमंत्रण देण्यासारखे आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण सांगता येईल की विटामिन डी दीर्घकाळ घेतल्यास शरीरामधील कॅल्शियमच्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे खडा होऊ शकतो. त्यासोबतच जास्त मीठ आणि प्रथिनयुक्त आहार, मटन, चिकन, मासे, अंडी, यामुळे देखील मुतखडा होण्याची शक्यता असते.
नक्की वाचा:मुतखड्यासाठी करा हे आयुर्वेदीक उपाय
मुतखड्यावरील घरगुती उपाय
1- सफरचंद व्हिनेगर- सफरचंदाचे व्हिनेगर मध्ये सायट्रीक ॲसिड चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ते किडनी स्टोनचे लहान लहान तुकडे करण्याचे काम करते. यासाठी कोमट पाण्यासोबत दोन चमचे व्हिनेगर घेतल्याने मुतखड्याच्या समस्येत खूप आराम मिळतो.
2- ऑलिव्ह आणि लिंबू- लिंबाच्या रसाचा उपयोग मूतखडे पडण्यास मदत करतो आणि ऑलिव्ह ऑइल मुतखडा बाहेर काढण्यास मदत करते.
त्यामुळे एक ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल टाकावे आणि व्यवस्थित एकत्र करून प्यायल्याने काही वेळात मुतखडा निघून जाऊ शकतो.
3- डाळिंबाचा रस- डाळिंब हे खूप परिणामकारक असून डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि मुतखडा मध्ये खूप आराम मिळतो.
4- पाथरचट्टा वनस्पती- ही वनस्पती कुठे ही सहज सापडते.एका पानात थोडी साखर घालून बारीक करा. दिवसातून दोन-तीन वेळा याचे सेवन केल्यास मुतखड्याचे मोठे मोठे खडे देखील काही वेळात बरे होतात
5- कुळीथ- जर कडे लहान असतील तर कुळित डाळीचे सेवन केल्याने अनेक वेळा खडे आपोआप वितळतात आणि बाहेर पडतात.
(टीप-वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. आहारात कुठलाही प्रकारचा बदल किंवा कुठलाही वैद्यकीय उपचार करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Published on: 01 July 2022, 06:01 IST