सध्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक हे नैराश्य आणि तणाव यामध्ये जीवन जगत आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे मानसिक आणि शारीरिक आजार लोकांना होतात. तसे पाहायला गेले तर आपल्या आहाराचा संबंध हा आपल्या शरीरासोबतच आपल्या मानसिक स्थितीवर देखील होत असतो.
बाबतीत या क्षेत्रातील शास्त्रज्ञांचे मान्य आहे की, फास्ट फुड आपल्याला चव देतात मात्र त्यांचा आपल्या मानसिक स्थितीवर म्हणजेच मुडवर पॉझिटिव परिणाम होत नाही.
त्यामुळे जेवणात झिंक, सेलेनियम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिज पदार्थांमुळे शरीरातील पेशींना तसेच मेंदूला ऊर्जा मिळते. सेरोटोनिन हे जे केमिकल आहे ते आपल्या मुडला प्रभावित करते. सेरोटोनिन आयर्न, विटामिन बी 12 आणि फोलेट यांच्यामुळे शरीरात बनवण्यात मदत होते.
आहारात करा या गोष्टींचा समावेश आणि रहा तणावमुक्त
1- हिरवी पाने असलेला भाजीपाला- हिरव्या पानांच्या भाज्यांमध्ये पोषकतत्वे खूप जास्त प्रमाणात असतात यामध्ये पालक, बीट तसेच सॅलडमध्ये फायबर, विटामिन सी आणि ए मोठ्या प्रमाणात असते. हे पदार्थ तुम्ही सूपच्या माध्यमातून जर घेतले तर त्याचा फायदा होतो.
2- विविध रंगाची फळे व भाज्या- भोजनामध्ये जेवढे अधिक रंगांचा समावेश तेवढा मेंदू उत्तम काम करतो. लाल मिरची, ब्रोकोली, वांगी तसेच मिरची सारखा भाजीपाला स्मरणशक्ती, तुमची झोप आणि तुमचा मूड प्रभावित करतो. तुम्ही आहारात फळांचा समावेश करू शकता. असेल तर भाज्यांमधून तुम्हाला फायटोनुट्रीऐंट्स मिळतात.
नक्की वाचा:MonkeyPox: जगभरात मंकीपाॅक्स विषाणूचे थैमान; जाणून घ्या मंकीपाॅक्सची लक्षणे
3- सी फूड आणि सब्जा- सीफुड हे विटामिन b12, सेलेनियम, झिंक, आयर्न हे प्रोटीन चे उत्तम स्त्रोत आहेत.जर तुम्ही शाकाहारी असाल तर चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स तसेच समुद्री भाज्या ओमेगा 3 एस देऊ शकता. आयस्टर( सिप), मसल्स ओमेगा 3 चिया सीड मिळवण्याचे उत्तम मार्ग असून मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
4- विविध प्रकारची कडधान्ये आणि खजूर-रोजच्या जेवणात अर्धा कप कडधान्य,सुकामेवा,विविध प्रकारच्या बियांचा समावेश करावा.काजू,बदाम,अक्रोड, बियासहित भोपळा हे उत्तम स्नेक्स आहेत. याला फ्राय करून किंवा सॅलडमध्ये मिसळून खाता येते. त्यासोबत डाळ, फळांचे सूप आणि सॅलडचा समावेश करता येतो. त्यापासून देखील चिंता व ताण तणाव कमी होतो.
5- डार्क चॉकलेट आणि इतर-दह्यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते. तसेच काही जेष्ठ व्यक्तींवर केलेल्या सर्वेनुसार जे लोक नियमित रूपाने डार्क चॉकलेट खातात त्यांच्या नैराश्याचा धोका 70 टक्क्यांनी घटतो असे सिद्ध झाले आहे.
( टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगतरित्या आणि कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही. आहारात कुठलाही बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Published on: 28 July 2022, 11:03 IST