सोरायसिस बऱ्याच जणांना माहिती असून हा एक त्वचा रोग आहे. यामध्ये त्वचेच्या कुठल्याही भागावर लाल रंगाचे चट्टे येतात व त्वचेला खाज सुटते व ती लाल होते. हे प्रामुख्याने गुडघ्यांवर, कोपर तसेच पाठीवर बहुतांशी दिसून येते.
हा एक फारच गंभीर स्वरूपाचा रोग असून जवळजवळ अडीच कोटी पेक्षा जास्त लोक या आजाराने संपूर्ण देशात ग्रस्त आहेत. बऱ्याचदा इतर काही कारणांमुळे देखील त्वचेवर लाल चट्टे येतात.
त्यामुळे बरेच जण याकडे एक कॉमन प्रॉब्लेम म्हणून लक्ष देत नाहीत. परंतु ही समस्या हळू हळू संपूर्ण शरीरभर पसरू लागते.
त्यामुळे या त्वचा रोगा पासून वाचण्यासाठी उपचार आवश्यक आहेतच परंतु आहारामध्ये ताबडतोब काही बदल करणे देखील गरजेचे आहे जेणेकरून सोरायसिस बरा होत नसला तरी तो वाढण्यापासून थांबवता नक्कीच येतो.
नक्की वाचा:आरोग्य ज्ञान: मुतखड्याचा त्रास असेल तर करा 'हे' घरगुती उपाय, होईल त्रास कमी
सोरायसिस त्वचेवर लाल चट्टे आणि खाज येत असेल तर ताबडतोब बंद करा या पदार्थांचे सेवन
1- चीज- हा एक चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ असल्यामुळे याच्या सेवनाने शरीरात सूज वाढू शकते आणि सोरायसिस ची लक्षणे देखील वाढण्याची शक्यता असते.
त्यामुळे चीज ऐवजी तुम्ही तुम्हाला जे पदार्थ आवडते ते खाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला बर्गर आणि सॅंडविच जास्त खाण्याची सवय असेल तरच चीज पूर्णपणे वेगळे करून खा.
2- रेड मिट-यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असल्यामुळे सोरायसिस रुग्णांची स्थिती बिघडू शकते. रेड मिटऐवजी लिन मिट जसे की चिकन आणि मासे खाल्ले तर काही समस्या नाही.
बऱ्याच जणांना माशांमध्ये चे omega-3 फॅट असते ते सोरायसिस नियंत्रीत करण्यासाठी मदत देखील करते.
3-दारू- दारू पिल्यामुळे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होते. मुख्यत्वे हृदय आणि यकृत यांचे आजार होतात त्यामुळे सोरायसिसचे त्रास देखील वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अल्कोहोल पासून दूर राहणे चांगले.
4- कॉफी- कॉफी आणि चहा यासारख्या गोष्टींमध्ये कॅफिन नावाचे रसायन असल्यामुळे शरीरात जळजळ होते. सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक आणि हॉट चॉकलेट मध्ये देखील कॅफीन असू शकते त्यामुळे या सर्व गोष्टी टाळणे चांगले असते.
5- चॉकलेट- चॉकलेट देखील के कॅफिनचा स्त्रोत असल्यामुळे प्रोटीन बार, चॉकलेट फ्लेवर्ड आईस्क्रीम, कॉफी आणि चॉकलेट पासून बनवलेले मिठाई पासून दूर राहणे गरजेचे असते.
6- ग्लूटेन- ग्लुटेन नावाचे प्रोटीन राई, गहू आणि जवस यामध्येमोठ्या प्रमाणात आढळून येते.हे प्रोटीन सोरायसिस च्या काही पेशंटना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ग्लूटन-फ्री आहार घेणे चांगले राहते.
( टीप- हा लेख एक सामान्य माहितीसाठी असून त्या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेल असे नाही. आहारात कुठलाही बदल करायचा असेल तर कृपया वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा.)
Published on: 02 July 2022, 03:28 IST